पुणे- जिल्ह्यातील मावळ लोकसभा मतदार संघासाठी मतदान सुरू झाले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी परिवारासह मतदान केले. विद्यमान खासदार असलेल्या श्रीरंग बारणे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांने आव्हान आहे.
पवार कुटूंबीयांकडून एका कुटुंबाची लढाई असल्यासारखा पार्थचा प्रचार - श्रीरंग बारणे - राष्ट्रवादी
राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेच्या काळात कमावलेला पैशाचा वापर मावळ लोकसभा निवडणुकीसाठी केला आहे. धनशक्तीच्या विरोधात आपली लढाई आहे, अशी टीका श्रीरंग बारणे यांनी केली.
श्रीरंग बारणे मतदान केल्यानंतर
मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये संपूर्ण पवार कुटुंबीय रस्त्यावर उतरले होते. एका कुटुंबाची लढाई असल्यासारखे पवार कुटुंबीय पार्थचा प्रचार करत आहे. आम्ही देशाची लढाई लढत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेच्या काळात कमावलेला पैशाचा वापर मावळ लोकसभा निवडणुकीसाठी केला आहे. धनशक्तीच्या विरोधात आपली लढाई आहे. मावळची जनता सच्ची आणि प्रामाणिक कार्यकर्त्याच्या पाठीशी उभी राहिल, असा विश्वास बारणे यांनी मतदानानंतर व्यक्त केला.