पुणे - तीन वर्षांपूर्वी एक बातमी महाराष्ट्रभर झळकली, की बाबासाहेब पुरंदरे आणि लता मंगेशकर यांचे निधन. आणि ते मी वाचतोय. त्या परमेश्वराचे माझ्याकडे लक्ष आहे.तो आपली वेळ सांभाळत आहे.आणि त्याची वेळ मी कधीच चुकवणार नाही. म्हणून दिलेली वेळ आणि दिलेला शब्द कधीच मोडायचा नाही. शिवाजी महाराजांचा हा गुण खूप मोठा आहे. त्यामुळे मी कोणत्याही कार्यक्रमाला किंवा लग्नाला वेळ दिली की त्यावेळेस मी उपास्थितच असतो, असे पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या 100 व्या वाढदिवसानिमित्ताने सांगितलं.
तो आपली वेळ सांभाळतोय म्हणून मी दिलेली वेळ चुकवत नाही - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे - mns raj thackrey
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आजच शंभराव्या वर्षात पदार्पण केले आहे. पुण्यातही त्यांचा वाढदिवस साजरा केला जात आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवस पुणे दौऱ्यावर आहे. गुरूवारी त्यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे