महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'होय... मी दाऊदला भेटलोय आणि दमही दिलाय' - संजय राऊत पुणे

खुप कमी लोक दाऊदला भेटलेत पण मी त्याच्याशी बोललोय. इतकेच नाही तर मी त्याला दमही दिला आहे, असा गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी एका जाहीर मुलाखतीत केला आहे.

sanjay raut and dawood ibrahim
संजय राऊत यांचा दाऊदला भेटलो असल्याचा दावा

By

Published : Jan 15, 2020, 3:36 PM IST

पुणे -शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची पुण्यात प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी बोलताना राऊत यांनी त्यांना विचारलेल्या अनेक प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरे दिली. मुलाखती दरम्यान बोलताना संजय राऊत यांनी आपण कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमला भेटलो असल्याचा खुलासा केला आहे.

'समोर पंतप्रधान असो की गृहमंत्री, आपण कोणाला घाबरत नाही. तुम्ही घाबरला नाहीत, तर तुमचे कोणीही नुकसान करू शकत नाही.' असे सांगत असताना राऊत यांनी, 'मी दाऊद इब्राहिमला पाहिले असून, त्याच्याशी बोललोय, इतकेच नाही तर त्याला दमही दिला आहे', असा गौप्यस्फोट केला.

हेही वाचा... शरद पवार काल, आज आणि उद्याही आमचे 'जाणता राजा'च.. मुंबईत कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी

काय म्हणाले संजय राऊत ?

  • खुप कमी पत्रकार आहेत जे दाऊदला भेटलेत. मात्र मी दाऊदला भेटलोय. मी त्याचे फोटोही काढले आहेत. एवढेच नाही तर मी त्याला दमही दिला आहे, असे राऊत म्हणाले.
  • दाऊदची भिती वाटली नाही का? याचे उत्तर देताना त्यांनी मला दाऊदची भिती वाटलीच नाही, असे म्हटले.
  • एकेकाळी मुंबईत अंडरवर्ल्डचा बोलबाला होता. मात्र आता तशी परिस्थीती राहिली नाही. एकेकाळी सरकार कोणाचे स्थापन करायचे, मुख्यमंत्री कोण होणार, हे अंडरवर्ल्डचे लोक ठरवायचे. मात्र, आता तसे राहिले नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
  • सुरवातीच्या काळात मी क्राईम रिपोर्टिंग केले. त्यामुळे अनेक अंडरवर्ल्डच्या लोकांना भेटलो. त्यावेळी दाऊदचीही भेट घेतली आहे. त्याचे फोटो देखील काढले आहेत. दाऊदला पाहीलेले आणि त्याच्यासोबत बोललेले खुप कमी लोक आहेत. त्यात मीही आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.

मी दाऊद बरोबर बोललो आहे. एवढेच नाही तर एकदा त्याला दमही दिला असल्याचा खुलासा राऊत यांनी केला.

हेही वाचा... 'शिवसेना सोयीनुसार भूमिका बदलत नाही; सरड्याप्रमाणे रंग बदलणाऱ्यांनी याचे भान ठेवा'

ABOUT THE AUTHOR

...view details