महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पर्यावरणाच्या संतुलनासाठी इलेक्ट्रिक वाहनाचा वापर काळाची गरज - आदित्य ठाकरे - पुणे इलेक्ट्रिक व्हेइकल न्यूज

इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करणे ही काळाची गरज असून भविष्यात नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात या वाहनाचा वापर करणे पर्यावरणाच्यादृष्टीने उपयुक्त ठरेल, असे आदित्य ठाकरे म्हणाले. इलेक्ट्रिक वाहन उत्पादन करणाऱ्या कंपनीस शासन प्रोत्साहन देत असल्याचे त्यांनी सांगितले.

आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे

By

Published : Sep 29, 2021, 4:34 PM IST

Updated : Sep 29, 2021, 4:45 PM IST

पिंपरी-चिंचवड -पर्यावरणाचा संतुलन राखण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करणे ही काळाची गरज असून भविष्यात नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात या वाहनाचा वापर करणे पर्यावरणाच्यादृष्टीने उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.

घेतली इलेक्ट्रिक वाहन प्रकियेची माहिती

ठाकरे यांनी पिंपरी येथील टाटा मोटर्स या कंपनीस भेट देवून इलेक्ट्रिक वाहन प्रकियेची माहिती जाणून घेतली, यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर होते. आदित्य यांनी इलेक्ट्रिक वाहन उत्पादन खर्च व कालावधी, वाहनाचा दर्जा, बॅटरी क्षमता, चार्जिंग कालावधी, नवीन तंत्रज्ञानावर आधारित बस निर्मिती आदी माहिती घेतली.

'अशा कंपन्यांस प्रोत्साहन'

वाहन निर्मितीबाबत समाधान व्यक्त करून ते म्हणाले, की मुंबई, पुणे यासारख्या महानगरात इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करणे काळाची गरज आहे. नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन उत्पादन करणेदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे. लांब व जवळच्या पल्ल्याचे अंतर लक्षात घेवून आसनक्षमतेची व्यवस्था करावी. इलेक्ट्रिक वाहन उत्पादन करणाऱ्या कंपनीस शासन प्रोत्साहन देत असल्याचे त्यांनी सांगितले.

Last Updated : Sep 29, 2021, 4:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details