महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

दानवेंच्या बेताल वक्तव्याचा पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेकडून निषेध

आज पिंपरी-चिंचवड शहरात शिवसेनेच्यावतीने दानवे यांचा निषेध नोंदवत फलकावरील फोटोला जोडे मारले. यावेळी कार्यकर्त्यांनी दानवे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

pimpri
pimpri

By

Published : Dec 12, 2020, 4:00 PM IST

Updated : Dec 12, 2020, 4:10 PM IST

पुणे -भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल केलेल्या विधानाच्या निषेधार्थ आज पिंपरी-चिंचवड शहरात शिवसेनेच्यावतीने दानवे यांचा निषेध नोंदवत फलकावरील फोटोला जोडे मारले. यावेळी कार्यकर्त्यांनी दानवे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

फोटोला जोडे मारले

दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी दोन दिवसांपूर्वी धक्कादायक विधान केले होते. याचे पडसाद आज पिंपरी-चिंचवड शहरात उमटले असून भोसरी येथे शिवसेनेच्यावतीने दानवे यांच्या फलकावरील फोटोला जोडे मारून निषेध केला आहे.

शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना केले होते बेताल वक्तव्य

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर हरयाणा आणि पंजाब येथील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. अद्याप त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नसून त्यांच्या आंदोलनाला अवघ्या देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या आंदोलनाबद्दल भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री आणि महाराष्ट्रातील स्थानिक नेत्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले असून धक्कादायक विधाने केली जात आहेत. भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी तर या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा केला आहे. या विधानामुळे महाराष्ट्रात राजकारण तापले असून विविध पक्ष, संघटना तीव्र संताप व्यक्त करत आहेत.

भोसरीतही आंदोलन

पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरीमध्येही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत रावसाहेब दानवे यांच्याविरोधात घोषणाबाजी करत फलकवरील फोटोला जोडे मारून निषेध नोंदवला. यावेळी जिल्हासंघटिका सुलभा उबाळे, विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, उपशहरप्रमुख अनिलसोमवंशी, युवासेना जिल्हाधिकारी सुरज लांडगे, सचिन सानप, समन्वयक अंकुश जगदाळे, दादा नरळे, सर्जेराव भोसले, विभाग प्रमुख सतीश दिसले, गणेश इंगवले, सतीश मरळ यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Last Updated : Dec 12, 2020, 4:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details