पुणे -महापालिकेने पावसाळ्यापूर्वी गटारे ओढे आणि नाल्यांच्या सफाईसाठी कोट्यवधींचे टेंडर काढले होते. मात्र प्रत्यक्षात कामे झालीच नाहीत. कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. त्यामुळे पावसाळ्यात शहरामध्ये ठिकठिकाणी पाणी साचले. असा आरोप करत शिवसेनेच्या वतीने सत्ताधारी भाजपविरोधात महापालिकेबाहेर आज आंदोलन करण्यात आले.
'नालेसफाईच्या टेंडरमध्ये भ्रष्टाचार', पुण्यात शिवसेनेचे सत्ताधारी भाजपाविरोधात आंदोलन - bjp
महापालिकेने पावसाळ्यापूर्वी गटारे ओढे आणि नाल्यांच्या सफाईसाठी कोट्यवधींचे टेंडर काढले होते. मात्र प्रत्यक्षात कामे झालीच नाहीत. कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. त्यामुळे पावसाळ्यात शहरामध्ये ठिकठिकाणी पाणी साचले. असा आरोप करत शिवसेनेच्या वतीने सत्ताधारी भाजपविरोधात महापालिकेबाहेर आज आंदोलन करण्यात आले.
शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली पुणे महापालिका भवनाच्या प्रवेशद्वारासमोर हे आंदोलन पार पडले. नाले सफाई न करता टेंडरचे पैसे कोणी खाल्ले ? भ्रष्टाचारी प्रशासन, आणि सत्ताधारी भाजपाचा धिक्कार असो अशा आशयाचे पोस्टर हातात घेऊन शिवसेनेने आंदोलन केले. तसेच भ्रष्टाचार करणाऱ्यांची तातडीने चौकशी करावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
महापालिकेकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे टेंडर काढले जाते. या टेंडरमध्ये भ्रष्टाचार केला जातोे. पुणेकरांना फसविणाऱ्या सत्ताधारी भाजपचा आम्ही निषेध करतो. लवकरात लवक सांडपाण्याचे व्यवस्थापन करून, पुणेकरांना या समस्येतून मुक्त करावे अशी मागणी यावेळी संजय मोरे यांनी केली.