महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'कोरोना'ला प्रतिबंध करणारी लस विकसित.. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटचा दावा - vaccine to prevent Corona virus

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी लस विकसित करण्यात आल्याचा दावा केला आहे.

corona
कोरोना

By

Published : Feb 19, 2020, 4:23 PM IST

पुणे - कोरोना व्हायरसला प्रतिबंध करणारी लस विकसित केल्याचा दावा पुण्यातील 'सिरम इन्स्टिट्यूट'ने केला आहे. चीनमधील वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसने आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी लस विकसित करण्यात आल्याचा दावा केला आहे. अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी कंपनी कोडाजेनिक्सच्या मदतीने ही लस विकसित करण्यात आली आहे. ही लस प्राथमिक स्तरावर वैद्यकीय चाचणीसाठी उपलब्ध असून, सहा महिन्यांनंतर एखाद्या व्यक्तीवर या लसची चाचणी केली जाईल. ही लस 2022 पर्यंत तयार होणार आहे, असे 'एसआयआय'चे सीईओ अदर पूनावाला यांनी सांगितले.

'कोरोना' रोखण्यासाठी एसआयआय आणि कोडाजेनिक्सद्वारे विकसित करण्यात आलेली लस या व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी एक सुरक्षाकवच असल्याचा दावा केला जात आहे. ही विकसित होणारी लस प्रचंड रोगप्रतिकारशक्ती निर्माण करते. ही लस सहा महिन्यात मानवी चाचणीसाठी तयार होईल. ही भारताची पहिली लस असेल, जी इतक्या वेगाने या स्तरापर्यंत आणण्यात यश प्राप्त झाले आहे. मानवी चाचणीनंतर या लसीला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मंजूरी मिळवावी लागेल. त्यानंतर कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी तिचा वापर करण्यात येईल. मानवी शरीरावर लसीच्या संशोधनासाठी एक वर्ष लागेल. 2022 च्या सुरुवातीला या लसीची निर्मिती होईल, अशी अपेक्षा आहे. ही लस विकसित झाल्याने जागतिक स्तरावर फैलावलेल्या साथीच्या रोगाचा सामना करण्यात भारत किती सक्षम आहे हेच यातून दिसते, असे पूनावाला यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details