महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pune Crime News : ऐकावं ते नवलचं, 'पोपट वारंवार शिट्टी मारतो, त्यामुळे...'; पुणेकराने केली पोलिसांत तक्रार

शेजारी असलेला पोपट शिट्टी वाजवून त्रास देत असल्याने थेट पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ( complain police station against parrot whistles in pune ) आहे.

police station against parrot whistles in pune
police station against parrot whistles in pune

By

Published : Aug 7, 2022, 5:16 PM IST

पुणे -तुम्ही सर्वांनी 'नवीन पोपट हा लागला मीठू मीठू बोलायला' हे गाणे ऐकलचं असेल. मात्र, आता पुण्यातील एका पोपटाचे मीठू मीठू करणे आणि शिट्ट्या मारणे त्याच्या मालकाला चांगलेच महागात पडलं आहे. शेजारी असलेला पोपट शिट्टी वाजवून त्रास देत असल्याने थेट पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ( complain police station against parrot whistles in pune ) आहे.

सुरेश अंकुश शिंदे (वय 72) यांनी याबद्दल पोलिसात तक्रार दिली आहे. अकबर अमजद खान यांच्यावर पुण्यातील खडकी पोलीस ठाण्यात भादवि. 504, 506 प्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. शिंदे आणि खान हे दोघे ही हे महात्मा गांधी वसाहत, तुळशी मार्केट शेजारी, शिवाजीनगर येथे राहयला आहे.

ही घटना ५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता घडली. तक्रारदार यांनी त्यांच्या शेजारी राहत असलेल्यांना तुमचा पोपट सारखा ओरडत असतो. तुमच्या पोपटामुळे आम्हाला त्रास होतो, तुम्ही तो दुसरीकडे कुठेतरी ठेवा, असे सांगितले. या कारणावरून पोपट मालकांनी शिंदे यांना शिवीगाळ करून तक्रारदार यांना मारण्याची धमकी दिली. यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा -Shalini Thackeray : 'तर मुख्यमंत्र्यांना रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्याची प्रथा मोडीत...'; शालिनी ठाकरेंचं आवाहन

ABOUT THE AUTHOR

...view details