पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आज एकाच वेळी दोन वेगवेगळ्या संघटनांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. यातली पहिली संघटना अभावीप ने मुख्य इमारतीच्या समोर रुग्णवाहिका घुसवत आंदोलन केल आहे. रुग्णवाहिका मुख्यइमारतीच्या गेटमधून आत नेतांना पोलीस आणि विद्यापीठाच्या सुरक्षारक्षकांसोबत त्यांची बाचाबाची झाली. तसेच पोलिसांकडून अडवणूक देखील केली गेली. मात्र अभावीपने ऋणवाहिका घेऊन थेट मुख्य इमारती समोर घोषणाबाजी केली. Protest against Pune university
युवक क्रांती दलाचे आंदोलन : हे घडत असतांनाच युवक क्रांती दलाने मुख्य इमारतीच्या बाहेरच्या गेटवर आंदोलन केले. पुर्नपरीक्षा व्हाव्यात आणि कुलगुरूंची पूर्णवेळ नेमणूक व्हावी, यासाठी विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केले. एकाच वेळी दोन ठिकाणी अशा पद्धतीची आंदोलन होत असल्याने, पोलीस आणि सुरक्षा रक्षकांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
कुलगुरू विरोधात आंदोलन : पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठांमध्ये विजय महाविद्यालयाच्या आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परीक्षांमध्ये घोळ झालेला असून; कुलगुरू घरी बसून कारभार करतात आणि विद्यार्थ्यांवर अन्याय होतो. या विद्यार्थ्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी पुण्यातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, आज यूनिवर्सिटी भागामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहे. विद्यार्थी यात मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत. विद्यापिठाने आमच्या मागण्या मान्य कराव्यात आणि आम्हाला आमचे म्हणणे मांडू द्यावे. कुलगुरू आमच्यावर दबाव आणत असून; ते आमच्या मागण्या ऐकुण घेण्यासाठी सुध्दा रुमच्या बाहेर येत नाहीत. त्यामुळे आम्ही आंदोलन करत असल्याचे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने म्हटले आहे.
प्रतिक्रिया देतांना आंदोलनकर्ते
प्रशासनाने नाही घेतली दखल : आज विद्यार्थी पुणे विद्यापीठाच्या परिसरामध्ये येऊन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परीक्षा भवन पुढे ते ठाण मांडून आंदोलन करत होते. मात्र प्रशासनातर्फे कुणीही त्यांची दखल घेण्यास आले नाव्हते. परंतु या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी कोठेही हार न मानता, मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आंदोलन सुरुच ठेवले होते.
ॲम्बुलन्स द्वारे आंदोलन : विद्यापीठ प्रशासन आजारी पडलेला आहे, म्हणून या ठिकाणी ॲम्बुलन्स आणून त्या अंबुलन्समध्ये परीक्षेचे जे पेपर आहेत, त्याचे निकाल आणि घोटाळा झाल्याचे पेपर विद्यार्थ्यांनी ठेवले. आणि अश्या अनोख्या पध्दतीने अंबुलन्स घेऊन, आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या विद्यापीठ परिसरामध्ये आंदोलन केले.Protest against Pune university