पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून देण्यात येणारे 'जीवनसाधना गौरव पुरस्कार' जाहीर करण्यात आले आहेत. यावर्षीच्या पुरस्कार्थींमध्ये, ग्रामविकासाच्या क्षेत्रात भरीव कार्य करणारे पोपटराव पवार, बीजांच्या स्थानिक प्रजातींचे जतन करणाऱ्या श्रीमती राहिबाई पोपेरे यांचा समावेश आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे जीवनसाधना गौरव पुरस्कार जाहीर... पुरस्कार्थींमध्ये पोपटराव पवार आणि श्रीमती राहिबाई पोपेरेंचाही समावेश... हेही वाचा... गायरान जमीन मिळविण्यासाठी शहीद जवानाच्या पत्नीची वर्षभरापासून पायपीट; जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे देण्यात येणारे जीवनसाधना गौरव पुरस्कार जाहीर झाले आहे. यावर्षीच्या पुरस्कारार्थीमध्ये ग्रामविकासाच्या क्षेत्रात भरीव कार्य करणारे पोपटराव पवार, बीजांच्या स्थानिक प्रजातींचे जतन करणाऱ्या श्रीमती राहिबाई पोपेरे यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबतच ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव, भटक्या-विमुक्तांच्या विकासासाठी कार्यशील असणारे गिरीश प्रभुणे, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेले शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अॅड. एस. के. जैन आणि जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य उभारणारे डॉ. विनोद शहा यांचाही पुरस्कार्थींमध्ये समावेश आहे.
या सहाही मान्यवरांना पुणे विद्यापीठाच्या वर्धापनदिनी म्हणजेच १० फेब्रुवारी रोजी आयोजित कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
हेही वाचा... देवेंद्र फडणवीसांचा ई-स्कूटरवरून फेरफटका मात्र पदाधिकाऱ्यांची दमछाक