महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अजित पवार हे आमच्या सरकारची 'स्टेपनी' - संजय राऊत - स्टेपनी

आमची गाडी घसरणार नाही याची आम्हाला खात्री होती. सरकार टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेच योग्य आहेत, तर अजित पवार स्टेपनी आहेत. मात्र, स्टेपनीसुद्धा महत्त्वाची असते, असे संजय राऊत म्हणाले.

sanjay raut on ajit pawar
अजित पवार हे आमच्या सरकारची 'स्टेपनी'

By

Published : Jan 15, 2020, 5:37 PM IST

पुणे -अजित पवार हे स्टेपनी आहेत, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. पुण्यातील एका मुलाखती दरम्यान बोलताना राऊत यांनी 'भाजप आणि अजित पवार' यांच्या सरकार स्थापनेच्या प्रयत्नावर आपल्या खास शैलीत भाष्य केले. अजित पवार भाजपसोबत गेले होते. पण ते पुन्हा परत आले. सरकार टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेच योग्य आहेत, तर अजित पवार स्टेपनी आहेत. मात्र, स्टेपनीसुद्धा महत्वाची असते, असे संजय राऊत यांनी म्हटले.

पुणे येथे खासदार संजय राऊत यांची प्रकट मुलाखत...

हेही वाचा... शरद पवार काल, आज आणि उद्याही आमचे 'जाणता राजा'च.. मुंबईत कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी

लोकमत वृत्तपत्रातर्फे पत्रकारिता पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संजय राऊत यांच्या हस्ते यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यानंतर संजय राऊत यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. मुलाखती दरम्यान संजय राऊतांनी विविध राजकीय मुद्द्यावर सडेतोड भाष्य केले.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत ?

'आमच्या गाडीचा नटबोल्ट ढिला करायचा प्रयत्न होईल हे माहित होते. पण आमची गाडी घसरणार नाही याची खात्री होती. आमची चाके शाबूद होती. मात्र, ते आमची स्टेपनी घेऊन गेले. स्टेपनी सुद्धा गाडीचा महत्त्वाचा भाग असतो. अजित पवार हे खूप महत्वाचे नेते आहेत. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत अजित पवारांसह सगळे परत आले. स्टेपनीशिवाय सरकार चालू शकत नाही. मात्र, अजित पवार हे आता स्टेपनी नाहीत, तर महत्वाचे चाक झाले आहेत. आणि ते चाक आता गाडीला लागलेही आहे', असे संजय राऊत यांनी म्हटले.

हेही वाचा... 'शिवसेना सोयीनुसार भूमिका बदलत नाही; सरड्याप्रमाणे रंग बदलणाऱ्यांनी याचे भान ठेवा'

सध्या राज्यात असलेले महाविकास आघाडीचे सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे. हे सरकार पूर्ण पाच वर्ष काम करेल. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या सरकारची निर्मिती झाली आहे. त्यामुळे या सरकारला धोका नाही. तसेच विरोधकांनीही मजबूत विरोधक म्हणून काम करावे, असेही राऊत यावेळी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details