पुणे - आज संभाजी राजे छत्रपती ( Sambhaji Raje Chhatrapati Press Conference ) यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackery ) यांच्यावर गंभीर आरोप लावले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारकडून ( Mahavikas Aghadi Government ) मला उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता. मात्र, तो शब्द त्यांनी मोडला, असे ते म्हणाले. दरम्यान संभाजीराजेंच्या या आरोपानंतर शिवसेनेचे परभणीचे आमदार संजय जाधव ( Sanjay Jadhav Replied To Sambhaji Raje ) यांनी संभाजीराजेंवर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेचा उमेदवार कोण असेल, ते शिवसेना ठरवेल. राजे काही शिवसेनेत नाही, असे ते म्हणाले.
काय म्हणाले संजय जाधव -शिवसेनेचा उमेदवार कोण असावा, हे शिवसेना ठरवेल. राजे हे काही शिवसेनेत नाही. त्यांनी शिवसेनेकडूनच का तिकीट मागावी ते ही अपक्ष? त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपकडे मागावी. तुम्ही 6 वर्ष भाजपचे खासदार होते. आत्ता शिवसेनेने तुम्हाला तिकीट का द्यावं? तरीही शिवसेनेने तुम्हाला प्रस्ताव दिला होता की शिवबंधन बांधा. पण तुम्ही तस केलं नाही. एकतर पक्षाचा स्वीकार करायचा नाही आणि परत म्हणायचा आम्हाला दिल नाही. याला अर्थ नाही, अशी टीका जाधव यांनी केली.