महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sangli Mass Suicide Case: म्हैसमाळ सामूहिक हत्याकांडातील मुख्य आरोपीला पुण्यातून अटक - न्यायालय

मांत्रिकाला विषारी गोळ्या देणाऱ्याला सांगली पोलिसांनी ( Sangli Police ) पुण्यातील तळेगाव येथून काल रात्री अटक ( Arrested ) केली आहे. मनोज चंद्रकांत शिरसागर ( वय - 48, सध्या रा. तळेगाव दाभाडे, जि. पुणे, मूळ गाव सोलापूर) असे त्याचे नावे आहे. न्यायालयाने त्याला 3 दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. मनोज शिरसागर हा मूळचा सोलापूरचा असून गेल्या अनेक वर्षापासून तो तळेगाव दाभाडे येथे राहत आहे.

सांगली सामूहिक आत्महत्या प्रकरण
सांगली सामूहिक आत्महत्या प्रकरण

By

Published : Jul 6, 2022, 1:07 PM IST

पुणे -मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील वनमोरे कुटुंबातील सामूहिक हत्याकांड प्रकरणी ( Sangli Mass Suicide Case ) वनमोरे कुटुंबीयांचे हत्याकांड करण्यासाठी मांत्रिकाला विषारी गोळ्या देणाऱ्याला सांगली पोलिसांनी ( Sangli Police ) पुण्यातील तळेगाव येथून काल रात्री अटक ( Arrested ) केली आहे. मनोज चंद्रकांत शिरसागर ( वय - 48, सध्या रा. तळेगाव दाभाडे, जि. पुणे, मूळ गाव सोलापूर) असे त्याचे नावे आहे. न्यायालयाने त्याला 3 दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. ( Sangli Mass Suicide Case )

मनोज शिरसागर हा मूळचा सोलापूरचा असून गेल्या अनेक वर्षापासून तो तळेगाव दाभाडे येथे राहत आहे. शिरसागर हा पुण्यात प्लॉटची एजंटगिरी करतो. तो सोलापूरचा असल्याने मांत्रिक आब्बास बागवान याचा तो मित्र आहे. ओळखीतूनच त्याने मांत्रिक बागवान याला विषारी गोळ्या दिल्या होत्या. परंतु, त्याने 'त्या' कोठून आणल्या आणि गोळ्या बनविणारी कंपनी कोणती याची चौकशी त्याच्याकडे करण्यात येत आहे.

विषारी गोळ्या देणारा आणि ती बनविणाऱ्या कंपनी कोण? याचा तपास तपास करत असताना गोळ्या देणारे संशयित पुण्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तळेगाव दाभाडे येथे छापा टाकून मनोज शिरसागर याच्यासह चौघांना ताब्यात घेतले होते. चौघांकडे कसून चौकशी केली असता, मनोज शिरसागर यानेच मांत्रिक बागवान याला विषारी गोळ्या पुरविल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे सांगली पोलिसांनी त्याला सोमवारी रात्री उशिरा अटक केली आहे.

वनमोरे कुंटुंबातील सदस्यांना तब्बल ९ बाटल्यांमध्ये मांत्रिक अब्बास बागवानने विषारी औषध प्यायला दिलं असल्याचं समोर आलं होत. गुप्तधन मिळवण्यासाठी मांत्रिकाला वनमोरे कुटुंबाकडून ४ वर्षांपासून पैसे देण्यात येत होते. मात्र, गुप्तधन मिळत नसल्याने पैसे परत देण्यासाठी वनमोरे कुटुंबाकडून मांत्रिकाकडे तगादा सुरू होता. त्यामुळे या मांत्रिकाने असं कृत्य केलं आहे.

काय आहे घटना? :म्हैसाळ गावातील नरवाड रोड, अंबिका नगर आणि हॉटेल राजधानी कॉर्नर या दोन ठिकाणी एकाच कुटुंबातील नऊ जणांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पशु वैद्यकीय डॉक्टर माणिक यल्लप्पा वनमोरे ( 49 ) आणि त्यांचा शिक्षक भाऊ पोपट यल्लप्पा वनमोरे ( 52 ) यांच्यासह त्यांची आई, पत्नी आणि मुलांचा समावेश आहे. डॉ. माणिक यल्लप्पा वनमोरे, पत्नी रेखा माणिक वनमोरे ( 45 ), आई अनीताई यल्लप्पा वनमोरे (28), मुलगी प्रतिमा माणिक वनमोरे, मुलगा आदित्य माणिक वनमोरे ( 15 ), पुतण्या शुभम पोपट वनमोरे ( 26 ) यांनी राजधानी हॉटेल जवळ तर दुसऱ्या घरात डॉ. माणिक यांचा भाऊ पोपट यल्लप्पा वनमोरे, संगीत पोपट (48 ) वनमोरे, मुलगी अर्चना पोपट वनमोरे ( 30 ) यांचे घरात मृतदेह आढळून आले आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.

अशी आली घटना उघडकीस :म्हैसाळ येथील नरवाड रोडजवळील अंबिका नगर चौकात असलेल्या घरात डॉ. वनमोरे यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबातील अन्य सहा सदस्यांसह आढळून आला. अंबिका नगर चौकातील घराचा दरवाजा सकाळपासून उघडला नसल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी दरवाजा ठोठावला आणि कोणीही प्रतिसाद न दिल्याने त्यांनी दरवाजा तोडला आणि घरात सहा जण मृतावस्थेत पडलेले दिसले. इतर तिघांचे मृतदेह नंतर राजधानी कॉर्नर येथील दुसऱ्या घरात आढळले. दोन परिवारातील 9 जणांच्या सामूहिक आत्महत्येमुळे संपूर्ण गाव हादरले आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा -Spiritual Leader Murder : येवल्यात गोळीबारात मुस्लिम धर्मगुरूची हत्या

ABOUT THE AUTHOR

...view details