महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सावित्रीबाईंच्या नावाआधी साध्वी लावल्याने नवा वाद; पुण्यात समता दलाकडून विरोध - पुणे महानगरपालिका

उद्यानाच्या नावात सावित्रीबाईंच्या नावाआधी असलेल्या साध्वी या उल्लेखाला समता दलाने आक्षेप घेतला आहे. समता दलाच्या कार्यकर्त्यांनी उद्यानाच्या नामफलकावरील साध्वी हा शब्द कागदाने झाकून टाकला आहे.

सावित्रीबाईंच्या नावाआधी साध्वी लावल्याने नवा वाद; पुण्यात समता दलाकडून विरोध
सावित्रीबाईंच्या नावाआधी साध्वी लावल्याने नवा वाद; पुण्यात समता दलाकडून विरोध

By

Published : Oct 1, 2021, 9:20 AM IST

पुणे :शहरातील ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाजवळ असलेल्या महानगरपालिकेच्या एका उद्यानाच्या नावावरून आता वाद सुरू झाला आहे. या उद्यानाचे नाव आहे साध्वी सावित्रीबाई फुले. उद्यानाच्या नावात सावित्रीबाईंच्या नावाआधी असलेल्या साध्वी या उल्लेखाला समता दलाने आक्षेप घेतला आहे. समता दलाच्या कार्यकर्त्यांनी उद्यानाच्या नामफलकावरील साध्वी हा शब्द कागदाने झाकून टाकला आहे.

सावित्रीबाईंच्या नावाआधी साध्वी लावल्याने नवा वाद; पुण्यात समता दलाकडून विरोध
असा सुरु झाला वादसध्या सोशल मिडीयाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून प्रत्येकजण आपली मते सोशल मीडियावर व्यक्त करत असतो. पुण्यातील छाया थोरात यांनी ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाजवळ असलेल्या महापालिकेच्या एका उद्यानाचा फोटो शेअर केल्यानंतर या वादाला खरी सुरूवात झाली. उद्यानाच्या नावातील साध्वी या उल्लेखाला अनेकांनी आक्षेप घेतला.समता दलाच्या वतीने करण्यात आलं आंदोलनसाध्वी सावित्रीबाई फुले या नावाला आक्षेप घेत पुण्यातील समता दलाच्या कार्यकर्त्यांनी साध्वी हा शब्द झाकून टाकला आहे. पुणे महानगरपालिका जाणीवपूर्वक महापुरुषांच्या नावाच्या पुढे हिंदुत्वाची विशेषणे जोडत असल्याचा आरोप समता दलाकडून करण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले यांच्या नावापूर्वी साध्वी हे विशेषण लावणे चुकीचे आहे. साध्वी म्हणजे ईश्वराला वाहून घेतलेली स्त्री. तुमच्या आई बहिणीला अशा पद्धतीने संबोधता का? ज्या ज्ञानज्योतीने तुम्हा आम्हाला उभं केलं, त्यांना असे संबोधणे चुकीचे आहे. महापालिकेच्या या कृतीचा निषेध असून येणाऱ्या आठवड्यात जर नाव बदलण्यात आलं नाही तर आम्ही तीव्र निषेध करू असा इशारा समता दलाच्या वतीने देण्यात आला आहे.साध्वी हे नाव का दिले हे शोधणे गरजेजे-सरोदेसाध्वी सावित्रीबाई फुले हा नामफलक काही लोकांच्या निदर्शनास आला आहे. महापालिकेत नाव ठरावण्याबाबत एक कमिटी असते. त्यात ठराव झाल्यानंतरच त्या उद्यानाला किंवा रस्त्याला नाव दिलं जातं. विजयसिंह मोहिते मंत्री असताना 1991 साली ही कोनशिला लावण्यात आली आहे. हे जरी त्यावेळेस करण्यात आलं असलं तरी या उद्यानाला साध्वी सावित्रीबाई फुले हे नाव का देण्यात आलं हे शोधण्याची गरज आहे असे मत कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी व्यक्त केले आहे. काँग्रेसच्या काळात साध्वी हे नाव या उद्यानाला देण्यात आलं आहे. त्यावेळी पालिकेच्या कमिटीत हे नाव कुणी दिलं होत? का दिलं होत? हे देखील शोधण्याची गरज आहे असे ते म्हणाले.

तरीही साध्वी हा उल्लेख चुकीचाच-सरोदे

हे नाव त्याकाळी देण्यात आलं असलं, तरी हे नाव आक्षेपार्ह असल्याचे सरोदे यांनी म्हटले आहे. सावित्रीबाई फुले ह्या रचनात्मक काम करणाऱ्या व्यक्ती आहे. सावित्रीबाई यांना साध्वी म्हणणे हे त्यांना एका धर्मात बांधल्यासारखे आहे. त्यामुळे त्यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असं आपण म्हणू शकतो. कारण त्यांनी क्रांती घडवून आणली होती. त्यामुळे आता महापालिकेने ते नाव बदलून दुसरी पाटी लावावी असे सरोदे म्हणाले.

हेही वाचा -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झाडा-फुलांची गर्दी

ABOUT THE AUTHOR

...view details