पुणे : नितीन गडकरी राज्यात मंत्री असताना त्यांच्या विनंतीवरून उद्योगपती रतन टाटा ( Businessman Ratan Tata ) औरंगाबादेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हॉस्पिटलच्या उदघाटनाला आहे होते. त्यावेळी टाटांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रुग्णालय असल्याने ते फक्त हिंदूंचच आहे का? असा सवाल गडकरींना केला होता. त्यावर हे रुग्णालय सर्वांसाठी असून, आरएसएसमध्ये असे सांगितले जात नसल्याचे टाटांना सांगितले ( Nitin Gadkari On RSS ) होते, अशी आठवण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Central Minister Nitin Gadkari ) यांनी आज पुण्यात बोलताना सांगितली.
नितीन गडकरी यांनी सांगितला तो किस्सा :नितीन गडकरी हे महाराष्ट्रात मंत्री असताना औरंगाबाद येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हेडगेवार हॉस्पिटलच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याचवेळी मुकुंदराव पणशिकर नावाचे गृहस्थ संघाचे प्रचारक होते. त्यांनी गडकरींजवळ आग्रह धरला की, या हॉस्पिटलचे उद्घाटन हे रतन टाटा यांच्या हस्ते करायचं आहे. त्यांच्या सांगण्यावरून नितीन गडकरी यांनी रतन टाटा यांना या कार्यक्रमाचे आमंत्रण दिलं. नितीन गडकरी यांच्या आग्रहास्तव रतन टाटा हे स्वतः औरंगाबादला डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटलच्या उद्घाटनाला उपस्थित राहिले. पण विमानातून उतरताच रतन टाटा यांनी नितीन गडकरी यांना 'ये हॉस्पिटल केवल हिंदू समाज के लिये है क्या?' असा प्रश्न विचारला. त्यावर गडकरी यांनी, 'तुम्हाला असं का वाटतं?' असं त्यांना विचारलं. रतन टाटा म्हणाले की, 'हे संघाचे हॉस्पिटल आहे म्हणून विचारलं'. पण गडकरी यांनी असं नाही असं सांगत, हे सर्व समाजासाठी असल्याचं सांगितले. सांगत संघात असा विचार कधीच शिकवला जात नाही, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले.