महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोना : पुण्यातील नागरिकांमध्ये वाढली प्रतिकारशक्ती, सेरोलॉजिकल सर्वेक्षणातून उघड - कोरोना सेरोलॉजिकल सर्वेक्षण

कोरोनाची बाधा होण्यात स्त्री आणि पुरुष असा भेदभाव दिसून येत नाही. ५२.८ पुरुषांना, तर ५०.१ महिलांना कोरोनाची लागण झाल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. ६६ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांमधे कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण सर्वात कमी म्हणजे ३२.६ टक्के आहे, तर सर्वाधिक प्रमाण हे ५१ ते ६५ वयोगटातील लोकांमध्ये आहे, जे ५० टक्के इतके आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

By

Published : Aug 17, 2020, 8:46 PM IST

पुणे- कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या पुण्यातील नागरिकांमध्ये आता कोरोनाविरोधात प्रतिकारशक्ती निर्माण होत असल्याचे सेरोलॉजिकल सर्वेक्षणातून समोर आले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, एज्युकेशन अँड रिसर्च या संस्थेने २० जुलै ते ५ ऑगस्ट या कालावधीत हे सर्वेक्षण केले आहे.

अहवाल

सर्वेक्षणासाठी पुण्यातील येरवडा, कसबा पेठ-विश्रामबाग, रास्ता पेठ-रविवार पेठ, लोहिया नगर-कासेवाडी, नवीपेठ-पर्वती या भागातील १ हजार ६६४ नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. सर्वेक्षणातील निष्कर्षांमध्ये या भागांमधील ५१.०५ नागरिकांमधे कोरोना विरुद्ध लढण्यासाठी आवश्यक असलेल्या अँटिबॉडिज आढळून आल्या आहेत.

कोरोनाची बाधा होण्यात स्त्री आणि पुरुष असा भेदभाव दिसून येत नाही. ५२.८ पुरुषांना, तर ५०.१ महिलांना कोरोनाची लागण झाल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. ६६ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांमधे कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण सर्वात कमी म्हणजे ३२.६ टक्के आहे, तर सर्वाधिक प्रमाण हे ५१ ते ६५ वयोगटातील लोकांमधे आहे, जे ५० टक्के इतके आहे. कोरोनाचा सर्वाधिक ५६ टक्के ते ६२ टक्के फैलाव हा चाळीत किंवा झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांमध्ये आहे. सार्वजनिक शौचालयाचा वापर करणाऱ्यांमध्ये कोरोनाचा फैलाव सर्वाधिक आहे.

हेही वाचा-पुण्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ

ABOUT THE AUTHOR

...view details