पुणे : ओबीसी आरक्षण ( OBC Reservation ) पुन्हा लागू झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील २८४ ग्रामपंचायतींचे आरक्षण ( De Reservation of 284 Gram Panchayat ) सोडत कार्यक्रम जाहीर केले आहे. त्यानुसार येत्या शुक्रवारी २९ जुलै आरक्षण सोडत ( Released on Friday 29 July ) होणार आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणासहीत निवडणुका होणार आहेत. त्याचबरोबर कोरोनाचा प्रभाव नसल्याने निवडणुका उत्साहात होणार यात शंका नाही. पुन्हा एकदा निवडणुकीचा धुरळा जोरात उडणार असेच चित्र दिसत आहे.
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत काढली : कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या दीड वर्षापासून ग्रामपंचायतीच्या निवडणुका लांबल्या होत्या. कोरोनाच्या संसर्गाची तीव्रता कमी झाली आहे. सर्वोच्च न्यायालानये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार आता आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार निवडणुका होणार आहेत. त्याकरिता प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. परिणामी, जिल्ह्यात नव्याने स्थापन झालेल्या २०२१ आणि २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या २८४ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडत काढली जाणार आहे.