पुणे - शहरात सध्या मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. मेट्रोच्या कामाचे खोदकाम सुरू असताना मंडई परिसरात अज्ञात प्राण्याचे अवशेष सापडले आहेत. हे अवशेष हजारो वर्ष जुने असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
हत्तीची हाडे असण्याची शक्यता
भुयारी मेट्रोसाठी मंडई परिसरात खोदकाम सुरू आहे. बुधवारी हे काम सुरू असताना कर्मचाऱ्यांना काही प्राण्यांची हाडे सापडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर मेट्रोचा कर्मचाऱ्यांनी हळूवारपणे खोदकाम केले असता त्यांना आणखी काही हाडे आढळून आली. या हाडांचा आकार मोठा असून ती हत्तीसारख्या मोठ्या प्राण्यांची असण्याची शक्यता आहे. दरम्यान ही हाडे कुठल्या प्राण्याची असावीत यावर मात्र पुणेकरांमध्ये चर्चा रंगली आहे.