पुणे- चंद्रकांत पाटील कोल्हापुरातून कोठूनही निवडणूक लढले तर मी त्यांच्याविरोधात उभा राहणार असल्याचे मी आधीच जाहीर केले होते. पण, त्यांनी पुण्याचा सहारा घेतला. एका भगिनीवर दादागिरी करुन ते पुण्यातून निवडणुकीला उभे राहिले. हे लोकशाहीत बसतं का? पुणेकरांना या गोष्टीचा राग यायला पाहिजे होता, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. पुण्यातील पत्रकार भवन येथे राजू शेट्टी यांचा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
राजू शेट्टी - अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना हेही वाचा -चंद्रकांत पाटील हे दिल्लीहून लादलेले उमेदवार होते - संजय काकडे
शेट्टी म्हणाले, निवडणुकीनंतर त्यांनी एक लाख साड्या वाटल्या. निवडणुकीआधी त्यांनी किती साड्या वाटल्या याची माहिती नाही. हे निवडणूक खर्चाच्या हिशोबात बसते का? त्यांच्याकडे एवढे पैसे होते का? मी कोल्हापूरचाच असल्यामुळे त्यांची पूर्वीची परिस्थिती मला माहिती आहे. एरवी उठसुठ कुणाच्याही मागे लागणारी ईडी या गोष्टीकडे का लक्ष देत नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून आम्ही भाजपला हद्दपार केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सांगली जिल्ह्यात थोड्याफार ठिकाणी भाजपचे अस्तित्व आहे. तेथूनही थोड्याच दिवसात भाजपला हद्दपार करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.