पुणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray Pune Sabha ) यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्यावर पुन्हा निशाणा साधला. शरद पवारांना औरंगजेब हा सुफी संत वाटतो, असा खोचक टोला त्यांनी शरद पवार यांना लगावला. तसेच तुमच्या राजकारणासाठी तुम्ही इतिहास बदलणार आहात का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
काय म्हणाले राज ठाकरे - शरद पवारांना औरंगजेब हा सुफी संत वाटतो. तर अफजलखान हा महाराजांना मारायला आलाच नव्हता, तर राज्याचा विस्तार करायला आला होता, असे पवार म्हणतात. मग काय शिवाजी महाराज मध्ये आले होते का?, असे राज ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरे यांनी काल महाविकास आघाडी सरकार झालेले बघून बाळासाहेब ठाकरे यांना आनंद झाला असता, असे वक्तव्य केले होते. त्याचाही राज ठाकरे यांनी समाचार घेतला. असे वक्तव्य करून शिवसेना बाळासाहेबांची क्रेडिबिलीटी घालवत आहेत, शिवसेनेला एवढीही अक्कल नाही, असे ते म्हणाले.