पुणे -शिवसेना नेते रघुनाथ कुचिक ( Raghunath Kuchik ) यांची पोलिसांनी 376 कलमनुसार जामिनावर सुटका केली आहे. हा जामीन अर्ज पोलिसांनी रद्द करावा अशी, मागणी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ ( Chitra Wagh ) यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केली. पोलिसांनी योग्य ते या घटनेचा तपास करण्याची मागणीही त्यांनी केली.
चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया हेही वाचा -Baramati Crime : महिलेच्या इच्छेविरुद्ध अत्याचार; पतीसह मित्रावर गुन्हा दाखल
राज्यात एकनाथ शिंदे-भाजप गटाचे ( Shinde-BJP Group) नवीन सरकार आलेले आहे. त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मंत्री मंडळामध्ये पूजा चव्हाण प्रकरणात ( Pooja Chavan case ) क्लीन चीट मिळालेले आमदार संजय राठोड ( MLA Sanjay Rathore ) यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्यावर चित्रा वाघ म्हणाल्या माझी आजही भूमिका तीच आहे सरकारमध्ये कोणाला मंत्री पद भेटणार याची अजून षटता झालेली नाही. मी माझी लढाई चालूच ठेवणार असे, वाघ म्हणाल्या.
हेही वाचा -Shrikant Deshmukh : भाजप सोलापूरचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यावर डेक्कन पोलिसात गुन्हा दाखल