पुणे - पुण्यात मोठी दुर्घटना घडली आहे. येरवडा शास्त्रीनगर वाडिया बंगल्याजवळ इमारतीची स्लॅबची जाळी कोसळून दहा कामगार गंभीर जखमी ( Pune Yerawda Building Slab Collapse ) झाले आहेत. तर या घटनेमध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांना कोणतीही मदत जाहीर झालेली नसून त्या कामगारांना त्यांच्या गावाला बॉडी घेऊन जाण्यासाठी कोणतीही व्यवस्था होत नसल्याने या कामगारांनी संताप व्यक्त केला आहे. तर ईटीव्हीशी बोलताना कामगाराच्या भावना नातेवाईकांनी व्यक्त केल्या आहेत, 'माझ्या भावाचा कामावर पहिलाच दिवस होता. त्याला म्हणत होतो तिथे नको करू काम. मला भावाच मृतदेह गावाला घेऊन जायचे आहे. कोणीही मदत करत नाहीये' असे त्यांनी सांगितले, यावेळी त्यांना भावना अनावर झाल्या होत्या.
- रात्री 10 वाजता शेवटचा कॉल -
काल झालेल्या घटनेत मोबीद आलम (वय 40 रा. बिहार), तजीब मोहम्मद शाहिद आलम (वय -17 वर्ष रा बिहार) मोहम्मद सोहिल मोहम्मद शेख (वय 22 वर्ष, रा बिहार), मोहम्मद शमीम (वय35 वर्ष, रा बिहार), मजरूम हुसेन (वय 35 वर्ष, रा बिहार) असे मृत्यू झालेल्या कामगारांचे नाव असून यातील ताजीब आलम या कामगाराच मोठे भाऊ मोहम्मद अंजार यांच्याशी बोलल असता तो म्हणाला की परवाच माझा छोटा भाऊ गावावरून आला होता. त्याला मी सांगितलं की तू तिथे काम नको करू, माझ्या इथं ये..पण तो म्हटला की काही दिवसांनी येतो आणि कामाला रुजू झाला आणि रात्री 10 वाजता शेवटचा कॉल आणि अशी घटना घडली असल्याचे यावेळी अंजार याने सांगितलं.
- 10 गंभीर, 5 जण जागीच ठार -