पुणे -पुणे शहराला शैक्षणिक राजधानी म्हंटल जातं. पुणे शहरात देश- विदेशातून तसेच राज्यातील ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थी हे शिक्षणासाठी येत असतात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राज्यातील ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी हे शिक्षणासाठी येत असतात. पण सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सध्या फक्त 169 प्राध्यापक असून तब्बल 215 पदे ही रिक्त असून विद्यापीठात अनेक विभाग हे बंद पडण्याच्या मार्गावर आहे.
एकेकाळी पूर्वचे ऑक्सफर्ड म्हणून नावलौकीक मिळविलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला आता उतरती कळा लागली आहे. अनुदानित पदांपैकी तब्बल ५६ टक्के प्राध्यापकांची पदे रिक्त असून, अनेक विभाग प्राध्यापकांविना बंद पडण्याची वेळ आली आहे. गेल्या १२ वर्षांपासून प्राध्यापक भरती बंद असल्याचा दूरगामी परिणाम विद्यापीठाच्या दर्जावर झाला आहे. अनेक विभागात प्राध्यापकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होत असून आम्ही आत्ता करायचं काय, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध विभाग असून या विभागांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. आणि पर्मनंट प्राध्यापक नसल्याने विभागांमध्ये पीएचडी करणारे तसेच पोस्ट डॉक्टर फॉलो असे विद्यार्थी काँट्रॅक्ट बेसवर एका वर्षासाठी घेत आहे. परंतु, हे जे काही विद्यार्थी आहे. त्यांच्याकडे कोणत्याही फेलोशिपच अनुभव नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. आम्ही गावाकडून शिक्षणासाठी आलो असताना. अश्या पद्धतीने जर आम्हाला शिक्षण मिळत असेल, तर आम्ही करायचं काय ? असा प्रश्न यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पीएचडी व शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे.