महाराष्ट्र

maharashtra

पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या सात दिवसात होतेय दुप्पट

By

Published : Apr 27, 2020, 10:21 PM IST

पुणे शहरात 19 एप्रिलला कोरोना बाधितांची संख्या 625 होती. यात दररोज सरासरी 50 ते 60 रुग्णांची वाढ होत आहे. कोरोना बाधितांचा हा आकडा 20 एप्रिलला 667, 21 एप्रिलला 705, 22 एप्रिलला 772, 23 एप्रिलला 886, 24 एप्रिलला 980 झालेला आकडा 25 एप्रिलला 1070 झाला आहे.

Pune the number of corona patient doubled in seven days
पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या सात दिवसात होतेय दुप्पट

पुणे -सात दिवसातकोरोनाबाधितरुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा वेग पुण्यात जास्त असल्याचा निष्कर्ष केंद्राने नोंदवला आहे. १९ एप्रिल ते २६ एप्रिल पासूनच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली.

पुणे शहरात 19 एप्रिलला कोरोना बाधितांची संख्या 625 होती. यात दररोज सरासरी 50 ते 60 रुग्णांची वाढ होत आहे. कोरोना बाधितांचा हा आकडा 20 एप्रिलला 667, 21 एप्रिलला 705, 22 एप्रिलला 772, 23 एप्रिलला 886, 24 एप्रिलला 980 झालेला आकडा 25 एप्रिलला 1070 झाला आहे.

पुणे शहरात 9 मार्चला पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आणि त्यानंतर रुग्णांच्या संख्येत वाढच होत गेली. गेल्या काही दिवसात पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या ही साधारण सात दिवसात दुप्पट होत असल्याचे निरीक्षण केंद्रीय पथकाने नोंदवले आहे. त्यामुळे पुण्यात प्रशासनाने विविध उपाययोजना तातडीने राबवण्याची गरज असल्याचे देखील सूचित करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details