महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

लॉकडाऊनमध्ये राज्यातील परप्रांतीयांसाठी ऑनलाईन अर्ज सुविधा, पोलिसांनी लाखो डिजिटल पासला दिली मंजुरी - lockdown digital passes pune

पुणे शहर पोलिसांकडून डिजिटल पाससाठी एक वेगळा विभाग तयार करण्यात आला असून यामध्ये 10 जण कार्यरत आहेत. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर एका तासाच्या आत परवानगी देण्यात येते.

पुणे
पुणे

By

Published : May 19, 2020, 5:59 PM IST

Updated : May 25, 2020, 2:54 PM IST

पुणे - लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या मजूर, विद्यार्थी, कामगारांना आपापल्या गावी जाण्यासाठी शासनाकडून डिजिटल पासची सेवा सुरू आहे. यामुळे अडकलेल्या लोकांना आपल्या मूळगावी जाता येत आहे. राज्यात किंवा राज्याबाहेर प्रवास करण्यासाठी पोलिसांकडून ई-पास दिला जात आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातील पोलिसांकडून आत्तापर्यंत लाखो लोकांना प्रवासासाठी परवानगी देण्यात आली आहे.

लॉकडाऊनमध्ये परप्रांतीयांसाठी ऑनलाईन अर्ज सुविधा

लॉकडाऊनमध्ये पुणे पोलिसांनी 91 हजारपेक्षा अधिक डिजिटल पासला दिली मंजुरी

पुणे पोलीस डॉट इन (punepolice.in) या वेबसाईटवरून लोकांना पास देण्याची सुविधा सुरू आहे. ऑनलाईन पाससाठी दोन गट तयार करण्यात आले असून यामध्ये वैयक्तिक ज्यांना जायचे आहे त्यांना आणि ज्यांना गटकरून जायचे आहे त्यांना, त्या-त्या पोलीस ठाण्यामध्ये नाव नोंदणी करावी लागते. वैद्यकीय प्रमाणपत्र आहे की, नाही तसेच ती व्यक्ती प्रतिबंधित क्षेत्रातील आहे का नाही, राज्याबाहेर जायचे असेल तर त्या राज्यातील परवानगी आहे का? हे प्रामुख्याने पाहिले जात आहे.

पुणे शहर पोलिसांकडून डिजिटल पाससाठी एक वेगळा विभाग तयार करण्यात आला असून यामध्ये 10 जण कार्यरत आहेत. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर एका तासाच्या आत परवानगी देण्यात येते. शहरात आत्तापर्यंत 91 हजार 483 पासेस मंजूर करण्यात आले आहेत. राज्यात प्रवासासाठी 79 हजार, राज्याबाहेरील 12 हजारापेक्षा जास्त पासेस मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त बच्चन सिंग यांनी दिली.

अर्जांमधील किचकटपणा कमी झाला असून ऑनलाईन अर्ज केल्यावर आता लवकरात लवकर अर्ज मंजूर करण्यात येत आहे, अशी माहिती सिद्धेश्वर उबाळे या विद्यार्थ्याने दिली. पुणे शहर पोलिसांकडून एका दिवसाच्या आत डिजिटल पासला परवानगी देण्यात येत आहे.

श्रमिकांसाठी पोलीस प्रशासन सज्ज

श्रमिकांसाठी ठाणे पोलीस प्रशासन सज्ज; तब्बल 60 हजार ई-पासेसद्वारे दीड लाख नागरिकांची पाठवणी

ठाणे शहरातून लॉकडाऊन कालावधीत घराची ओढ लागलेल्या श्रमिकांचे मूळगावी प्रयाण सुरूच आहे. दररोज रेल्वे, एसटी बसेस तसेच व्यक्तीगत वाहनांद्वारे ही मंडळी रवाना होत असल्याने सर्वांना प्रवासाची परवानगी (ई-पासेस) देण्यासाठी पोलीस यंत्रणा अहोरात्र राबत आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयातील पाच परिमंडळात 1 ते 20 मे दरम्यान तब्बल 20 हजार ऑनलाईन तर, 40 हजार ऑफलाईन पासेस वितरीत करून सुमारे दीड लाखांच्या आसपास नागरिकांना प्रवासाची अनुमती दिली आहे. दरम्यान, काही त्रुटी व तांत्रिक बाबींमुळे अंदाजे 10 हजार अर्ज प्रलंबित आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्तालयाकडून देण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे मजूर, कामगार व हातावर पोट असणाऱ्या श्रमिकांचे हाल होऊ लागले. त्यामुळे, अनेकांनी कुटुंबासह पायपीट तसेच मिळेल त्या वाहनाने गावाकडे धाव घेतली. यासाठी लागणारे ई-पासेस, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या निर्देशाने 1 ते 5 परिमंडळातील संबधित क्षेत्रातील पोलीस ठाण्यातून देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यानुसार, 1 ते 20 मे या कालावधीत ऑनलाईन अर्ज केलेल्या 19 हजार 361 ई-पासेसच्या माध्यमातून 78 हजार 859 प्रवाशांना अनुमती देण्यात आली, तर, 40 हजार ऑफलाईन अर्जांनाही मंजुरी दिली असून तब्बल 10 हजार अर्ज अद्याप प्रलंबित आहेत.

दरम्यान, 3 ते 22 मे या कालावधीत ठाणे, कल्याण व भिवंडी रोड स्थानक येथून 22 ट्रेन्समधून 30,958 श्रमिकांना त्यांच्या मूळ गावी पोहोचवण्यात आले. यात बिहार राज्यातच तब्बल 14 आणि 5 ट्रेन्स उत्तर प्रदेशमध्ये सोडल्या आहेत, तर, 10 ते 20 मे या दहा दिवसात 1691 एसटी बसेसमधून 43 हजार 111 श्रमिकांना राज्यांच्या सीमेपर्यत सोडण्यात आले असून अद्याप ही सेवा सुरूच असल्याची माहिती पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.

सोलापुरातील परप्रांतीय

सोलापूर जिल्ह्यातील 20 हजारांपेक्षा जास्त परप्रांतीयांचे ऑनलाईन अर्ज मंजूर

सोलापूरजिल्ह्यातून 27 हजार 735 व्यक्तींना परराज्यात जाण्याची परवानगी मागितली होती. त्यापैकी आजपर्यंत 20 हजार 466 परप्रांतीय हे त्यांच्या राज्यात रवाना झाले आहेत, तर उर्वरीत 7269 परप्रांतीयांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठीचे नियोजन कऱण्यात आले आहे. त्या राज्यांकडून परवानगी मिळाली की सोलापुरातून रेल्वेद्वारे हे परप्रांतीय पाठविण्यात येणार आहेत

सोलापूर जिल्ह्यात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातून परराज्यात जाण्यासाठी एकूण 27 हजार 735 लोकांनी ऑनलाईन अर्ज सादर केला होता. यामध्ये सोलापूर पोलीस आयूक्तालयाच्या हद्दीतील 13 हजार 436 तर सोलापूर ग्रामीण पोलीस हद्दीतील 11 हजार 277 जणांचा समावेश होता. यापैकी 20 हजार 466 व्यक्तींना त्यांच्या राज्यात रवानगी करण्यात आली आहे. तर 7 हजार 269 व्यक्ती शिल्लक आहेत. त्यांची जाण्याची व्यवस्था कऱण्यात आली असून त्या सर्वांना रेल्वेने सोडण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. 20 मे पर्यंत रेल्वे द्वारे एकूण 6 हजार 356 जणांना सोडण्यात त्यांच्या राज्यात सोडण्यात आले आहे, तर दिनांक 21 मे रोजी पंढरपूर रेल्वे स्टेशनवरून रांची साठी श्रमिक रेल्वे रवाना झाली. या रेल्वे मध्ये 1323 व्यक्तींना त्यांच्या राज्यात सोड़ण्यात आले आहे.दिनांक 9 मे रोजी पंढरपूर रेल्वे स्टेशऩवरून तामिळनाडुसाठी श्रमिक रेल्वे सोडण्यात आली होती. यामध्ये 981 जणांना पाठविण्यात आले आहेत.त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये जे शिल्लक राहिलेले व्यक्ती आहेत. त्या सर्वांच्या जाण्याची व्यवस्था कऱण्यात आलेली आहे. 24 मे पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील सर्व परप्रांतीयांना त्यांच्या राज्यात सोडण्यात आले आहे.

नियोजन पुढीलप्रमाणे

दिनांक 24 मे रोजी सोलापूर रेल्वे स्टेशनवरून हावडा साठी श्रमिक रेल्वे सोडण्यात येणार आहे. या रेल्वेमध्ये 1486 व्यक्तींना त्यांच्या राज्यात सोडण्यात आले.

दिनांक 23 मे रोजी पंढरपूर रेल्वे स्टेशन वरून जोघपूरसाठी श्रमिक रेल्वे सोडण्यात येणार आहे. या रेल्वे मध्ये 1434 व्यक्तींना त्यांच्या राज्यात सोडण्यात आले आहे.

दिनांक 22 मे रोजी पंढरपूर रेल्वे स्टेशनवरून पटना साठी श्रमिक रेल्वे सोडण्यात येणार आहे. या रेल्वे मध्ये 1376 व्यक्तांना त्यांच्या राज्यात सोडण्यात आले आहे.

दिनांक 20 मे रोजी सोलापूर रेल्वे स्टेशनवरून लखनौसाठी श्रमिक रेल्वे सोडण्यात आली आहे. या रेल्वेमध्ये 1632 लोकांना त्यांच्या राज्यात सोडण्यात आले आहे.

दिनांक 20 मे रोजी पंढरपूर रेल्वे स्टेशनवरून लखनौसाठी श्रमिक रेल्वे सोडण्यात आली. यामध्ये 1361 लोकांना त्यांच्या राज्यात सोडण्यात आले आहे.
दिनांक 17 मे रोजी सोलापूर रेल्वे स्टेशनवरून लखनौसाठी रेल्वे श्रमिक रेल्वे सोडण्यात आली होती. त्या रेल्वेमध्ये 1146 लोकांना त्यांच्या राज्यात सोडण्यात आले आहे.
दिनांक 14 मे रोजी कुर्डूवाडी रेल्वे स्टेशनवरून लखनौसाठी रेल्वे सोडण्यात आली. यामध्ये एकूण 1236 लोकांना त्यांच्या राज्यात सोडण्यात आले आहे.

Last Updated : May 25, 2020, 2:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details