पुणे - शहरात येणाऱ्या महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांना दारूच्या बाटल्यांचा हार घालून स्वागत करू, असा इशारा देणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मुख्यमंत्र्यांना दारूच्या बाटल्यांचा हार घालण्याचा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतले हेही वाचा... उदयनराजे गेले तरी प्रजा आमच्यासोबत आहे - छगन भुजबळ
‘दारूमुक्त महाराष्ट्र’च्या मागणीसाठी दारूच्या बाटल्यांचा हार घालून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करण्याचा मनोदय जाहीर केलेल्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना सहकारनगर पोलिसांनी शनिवारी त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. प्रतिबंधात्मक कारवाईनंतर देसाई यांना सोडून देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शनिवारी संध्याकाळी पुण्यात येत आहे.
हेही वाचा... सत्ताधारी धर्माच्या नावाने दहशत निर्माण करतायेत; पवारांचे सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र
दारूच्या बाटल्यांच्या हारासहित पोलीसांनी तृप्ती देसाई यांना त्यांच्या घरातूनच ताब्यात घेतले आहे. तृप्ती देसाई "दारूमुक्त महाराष्ट्र"च्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना दारूच्या बाटल्यांचा हार घालून स्वागत करणार होत्या.