पुणे -सध्या गेल्या काही दिवसांपासून राज्यासह पुणे शहरात ( Pune City ) मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस ( Heavy rain ) होत असून, या पाऊसात जे धोकादायक वाडे आहेत. ते वाडे ( Wada ) अचानक पडू नये, या पाश्र्वभुमिवर पुणे महापालिकेच्या ( Pune Municipal Corporation ) वतीने शहरतील तब्बल 478 वाड्यांना नोटीस ( Notice ) देण्यात आली आहे. तर पावसाळ्याच्या आधी शहरातील विविध भागातील जे अतिधोकादायक वाडे आहे अशा एकूण 38 हून अधिक वाडे हे पाडण्यात आले आहेत.
यंदाच्या पावसाळ्यात शहरातील जवळपास ४७८ धोकादायक वाडे आणि इमारती आहेत. ज्यांना पुणे महापालिकेच्या वतीने नोटीस देण्यात आले आहेत. या ज्या नोटीस देण्यात आल्या आहेत. शासनाच्या नियमानुसार सी1, सी2 आणि सी3 अश्या 3 भाग करण्यात आले होते. सी1 मध्ये जे अतिधोकादायक 28 वाडे होते. त्या सर्व वाडे हे पाडण्यात आले आहे. तर सी 2 मध्ये 316 वाडे होते. त्यामधील जे 11 अतिधोकादायक वाडे होते. ते देखील पाडण्यात आले आहे. सी 3 मधील 134 वाड्यापैकी 9 वाडे हे पाडण्यात आले आहे. पुणे महापालिकेच्या वतीने यंदाच्या पाऊसाच्या आधी शहरातील एकूण 38 अतिधोकादायक वाडे हे पाडण्यात आले आहेत, अशी माहिती यावेळी पुणे महापालिकेचे बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सुधीर कदम यांनी दिली आहे.
पुणे महापालिकेच्या वतीने नोटीस देण्यात आले -पुणे महापालिकेच्या वतीने पावसाळ्यात शहरातील जे काही धोकादायक वाडे आहे. या वाड्यावर नजर ठेवून असतात. पावसाळ्यात कोणतीही दुर्दैवी घटना घडू नये, यासाठी सर्व कर्मचारी हे 24 तास तत्पर असतात. शहरात जर एखादी भिंत कोसळली किंवा वाडा पडला असला, तरी महापालिकेचे कर्मचारी हे लगेच त्या ठिकाणी पोहचून आपल काम करत असतात, असे देखील यावेळी कदम यांनी यावेळी सांगितले आहे.
पुढील 4 ते 5 दिवस चांगला पाऊस होण्याची शक्यता-शहरात सध्या पाऊस जोर धरत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 4 ते 5 दिवस चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसामध्ये दरवर्षी शहरात काही जुन्या इमारतींच्या भिंती किंवा काही भाग कोसळण्याचे प्रकार घडतात. हे प्रकार टाळण्यासाठी पावसाळ्यात धोकादायक इमारती, वाडे पडून होणाऱ्या दुर्घटनांना आळा घालण्यासाठी पालिकेने धोकादायक इमारती उतरवण्याची खास मोहीम हाती घेतली आहे.
478 वाड्यांना नोटीस - दरवर्षी पावसाळ्यात सीमाभिंती आणि जुन्या इमारती कोसळून होणारी जीवितहानी लक्षात घेऊन महापालिकेने सीमाभिंती आणि जुन्या इमारतींचे सर्वेक्षण करते. त्यानंतर धोकादायक इमारतींना नोटीस देण्यात येतात. यंदाच्या या पावसाळ्यात शहरातील एकूण 478 वाड्यांना नोटीस देण्यात आल्या आहे. शहरातील जे 478 वाड्याना नोटीस देण्यात आले आहेत. त्यात प्रामुख्याने शहरातील मध्यवर्ती भागातील नाना पेठ, रास्ता पेठ, सोमवार पेठ, गणेश पेठ, कसबा पेठ अशा पेठामधील वाड्यांना नोटीस देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा -पंचगंगा इशारा पातळीकडे, 15 तासांपासून पाणीपातळीत 6 इंच वाढ