महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

LOCKDOWN 3.0 : पुण्यातील नियम शिथिलतेला महापौरांचाच विरोध - Mayor Muralidhar Mohol

'पुण्यात आजपासून अत्यावश्यक सेवेसह प्रत्येक लेनमधील पाच दुकाने सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत खुली ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. या निर्णयाला माझा विरोध आहे' असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे.

Mayor Muralidhar Mohol
महापौर मुरलीधर मोहोळ

By

Published : May 4, 2020, 6:23 PM IST

पुणे - शहर हे राज्यातील मुंबईनंतरचे सर्वाधिक कोरोनारुग्ण असलेले शहर आहे. शहरात दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी, सरकारकडून लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात करण्यात आलेल्या नियम शिथिलतेला पुण्यात लागू करण्यास विरोध केला आहे.

'पुण्यात आजपासून अत्यावश्यक सेवेसह लेनमधील पाच दुकाने स. १० ते सा. ६ पर्यंत खुली ठेवण्याचा निर्णय घेतला गेलाय. याला माझा विरोध आहे' असे त्यांनी म्हटले आहे. याबाबतची स्पष्ट भूमिका त्यांनी ट्विटरवर मांडली आहे.

'आज सकाळपासून पुण्यातील सर्वच रस्त्यांवर असणारी गर्दी चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवा, त्याही सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत संपूर्ण शहरात असाव्यात, अशी माझी मागणी आहे. शिवाय नव्या आदेशानुसार १० ते ७ वेळ असल्याने लोक दिवसभरही बाहेर असू शकतील. यावर नियंत्रण कसे आणणार ? पुण्यात संवेदनशील परिस्थिती असताना लॉकडाऊन शिथिल करायचा असेल तर त्याबाबत पूर्णपणे अंमलबजावणी करुन निर्णय घेणे आवश्यक आहे. नव्या आदेशामुळे पुणे शहर पोलिसांवर यांचा मोठा ताण येण्याची शक्यता नाकारता येत नाही' असे महापौरांनी म्हहटले आहे.

'कोरोनासंदर्भात लढा देताना गेली दीड महिना मी स्वतः प्रत्यक्ष फिल्डवर आहे. त्यामुळे संक्रमणाच्या या टप्प्यावर इतका वाढीव वेळ आणि सवलती देणे पुणेकरांना परवडणारे नाही. किंबहुना मोठ्या धोक्याला हे निमंत्रण देण्यासारखे आहे' असे आपले मत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details