महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

​पुण्यात राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी केले ध्वजारोहण; स्वातंत्र्य सैनिकांसह उपस्थितांना दिल्या शुभेच्छा

पुणे विधानभवनाच्या प्रांगणात मुख्य ध्वजारोहणचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी चे. विद्यासागर राव यांनी ध्वजारोहण समारंभाला उपस्थित स्वातंत्र्य सैनिकांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

विद्यासागर राव

By

Published : Aug 15, 2019, 6:20 PM IST

Updated : Aug 15, 2019, 11:47 PM IST

पुणे - भारतीय स्वातंत्र्याचा 73 वा वर्धापन दिन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करून उत्साहात पार पडला. पुणे विधानभवनाच्या प्रांगणात मुख्य ध्वजारोहणचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

​राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते पार पडला मुख्य ध्वजारोहण समारंभ

ध्वजारोहणानंतर राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी पोलीस पथकाची मानवंदना स्वीकारली. यानंतर त्यांनी ध्वजारोहण समारंभाला उपस्थित स्वातंत्र्य सैनिकांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पुणे पोलीस आयुक्त डॉ के. व्यंकटेशम, प्रशासकीय अधिकारी, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, निवृत्त अधिकारी, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.

Last Updated : Aug 15, 2019, 11:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details