पुणे- एका ट्रकमधून नेला जाणारा ८३५ किलो वजनाचा गांजा डीआरआय (डिरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स) च्या पुणे विभागाच्या पथकाने जप्त केला. या गांजाची किंमत 1 कोटी 25 लाख रुपये इतकी आहे. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली. मंचर निरगुडकर रस्त्यावरील पिंपळे गाव खडकी येथे ही कारवाई करण्यात आली.
पुण्यातून तब्बल ८३५ किलो गांजा जप्त; डीआरआयची मोठी कारवाई - ganja in pune
या गांजाची किंमत १ कोटी २५ लाख रुपये इतकी आहे. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली.
गुंडू राव पाटील, अमित ज्ञानेश्वर बिडकर, दीपक, इलयाबकास बाबमिया मुंडे आणि नासीर गफूर पठाण, अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. एनडीपीएस कायद्यानुसार त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.
डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मंचर निरगुडकर रस्त्यावरून गांजाची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पिंपळेगाव खडकी येथे सापळा रचून एक ट्रक पकडला. या ट्रकसमोरच एक इनोव्हा गाडी जात होती. या दोन्ही गाड्यातील पाच जणांना ताब्यात घेऊन डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली. ट्रकची तपासणी केली असता त्यात लपवून ठेवलेले १४९ बॉक्स आढळले. या बॉक्समध्ये तब्बल ८३५ किलो गांजा होता. हा गांजा, वाहतूक करणारा ट्रक आणि इनोव्हा गाडी असा १ कोटी २५ लाख ३२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.