महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pravin Chavan Reply : फडणवीसांनी केलेले आरोप खोटे, चौकशीला सामोरे जायला तयार - विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण - Pravin Chavan reply to Devendra Fadnavis allegations

विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण (Pravin Chavan) यांचे कार्यालय हे विरोधकांची कत्तल कशी करायची याचे कारस्थान शिजण्याचे मुख्य ठिकाण आहे. त्याच ठिकाणी गिरीश महाजन यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा कट रचल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला होता. यावर प्रवीण चव्हाण यांनी पहिल्यांदा 'ई टीव्ही भारत'कडे प्रतिक्रिया दिली.

Pravin Chavan
विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण

By

Published : Mar 8, 2022, 8:52 PM IST

Updated : Mar 8, 2022, 10:07 PM IST

पुणे - विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण (Pravin Chavan) यांचे कार्यालय हे विरोधकांची कत्तल कशी करायची याचे कारस्थान शिजण्याचे मुख्य ठिकाण आहे. त्याच ठिकाणी गिरीश महाजन यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा कट रचल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला होता. यावर प्रवीण चव्हाण यांनी सर्वात पहिल्यांदा 'ई टीव्ही भारत'कडे प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यावर जे आरोप करण्यात आले त्यात काहीच तथ्य नाही. चौकशी झाली तर मी सामोरे जायला तयार आहे, असे प्रवीण चव्हाण म्हणाले.

प्रतिनिधींनी प्रवीण चव्हाण यांच्यासोबत साधलेला संवाद

विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांची प्रतिक्रिया -

विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप करणारे व्हिडिओ असलेला एक पेन ड्राईव्ह देवेंद्र फडणवीसांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. त्यामध्ये गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करताना कशा प्रकारचे कटकारस्थान सरकार रचत आहे याचा खुलासा करणारे अनेक व्हिडिओ असल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. यावर प्रवीण चव्हाण म्हणाले की, माझ्यावर आरोप करण्यात आले आहेत ते सर्व चुकीचे आरोप आहेत. मी त्याचे खंडन करतो आणि जर चौकशी झाली तर मी त्या चौकशीला सामोरे देखील जाऊ शकतो, असे प्रवीण चव्हाण म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी केले विधानसभेत गंभीर आरोप -

भाजपच्या नेत्यांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवण्यासाठी सरकारी वकील आणि काही पोलीस अधिकारी षडयंत्र रचत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला. या संदर्भात आपल्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग असून सव्वाशे तासांच व्हिडिओ रेकॉर्डिंग असलेला पेन ड्राईव्ह ( Devendra Fadnavis pen drive bomb ) असल्याचा दावा त्यांनी ( Opposition leader Devendra Fadnavis accuses ) सभागृहात केला.

विरोधकांना संपवण्याचे काम हे सरकार कधीपासून त्यासाठी पोलीस यंत्रणेचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (मंगळवार) विधानसभेत ( Opposition leader Devendra Fadnavis in assembly ) केला. या प्रश्नावर चर्चा करताना त्यांनी सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या. माजी मंत्री गिरीश महाजन यांना कसे फसवले जात आहे, याबाबत त्यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग विधानसभा उपाध्यक्ष यांच्याकडे सुपूर्द केले गिरीश महाजन यांना मोका लागला पाहिजे यासाठी त्यांच्यावर बनावट केस कशी दाखल होईल यासाठी सरकारी वकील यांनी रचलेले षडयंत्र त्यांनी आपल्या तोंडाने सांगितले आहे त्याबाबतचे रेकॉर्डिंग आपण सभाग्रहात दिल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. यंत्राच्या मागे कोण आहे याचा खुलासा करावा अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली.

भाजपाचे माजी मंत्री गिरीश महाजन यांना फडकवणारच यासाठी खोटे साक्षीदार तयार करा रामेश्वर आणि महाजन यांचे नाव घ्या ट्रक प्रकरणाचा उल्लेख केला तर मोका लागेल तसे पुरावे तयार करा अशी चर्चाही झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस, जयकुमार रावल, सुभाष देशमुख, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील हे आपले लक्ष असल्याचे या व्हिडिओत संबंधित व्यक्ती बोलत आहेत.

Last Updated : Mar 8, 2022, 10:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details