महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

धक्कादायक..! पुण्यात खासगी बस चालकाने अपहरण करत महिलेवर केला बलात्कार - खासगी बस चालक

खासगी बस चालकाकडून वाशिम येथून पुण्यात आलेल्या एका महिलेचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी ट्रॅव्हल चालकाला स्वारगेट पोलिसांनी केली अटक केली आहे. नवनाथ शिवाजी भोग ( वय 38 वर्षे) असे आरोपीचे नाव आहे.

पुण्यात खासगी बस चालकाने अपहरण करत महिलेवर केला बलात्कार
पुण्यात खासगी बस चालकाने अपहरण करत महिलेवर केला बलात्कार

By

Published : Jun 13, 2022, 10:59 AM IST

Updated : Jun 13, 2022, 5:01 PM IST

पुणे -ट्रॅव्हल्स चालकाकडून वाशिम येथून पुण्यात आलेल्या एका महिलेचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी ट्रॅव्हल चालकाला स्वारगेट पोलिसांनी केली अटक केली आहे. नवनाथ शिवाजी भोग ( वय 38 वर्षे) असे आरोपीचे नाव आहे. पीडिता व तिच्या पतीचे विश्वास संपादन करुन बसमध्ये झोपण्यास सांगितले. पीडितेचा पती नैसर्गिक विधीसाठी खाली उतरल्यानंतर बस पळवून नेत महिलेवर भोग याने बलात्कार केला.

वाशीम येथून कामाच्या शोधासाठी पती पत्नी पुण्यात आले होते. त्यावेळी शनिवारी (दि. 11 जून) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास स्वारगेट एस.टी. स्टॅण्ड परिसरात झोपण्यासाठी जागा शोधत होते. तेवढ्यात खासगी बस चालक आरोपी नवनाथ शिवाजी भोग हा पीडित महिला व तिच्या पतीस तुम्ही माझ्या बसमध्ये झोपा, एवढ्या रात्री कुठे जागा मिळणार, असे त्यांनी सांगितले. त्यावर विश्वास ठेवून दोघे बसमध्ये आराम करण्यास गेले. तेवढ्यात पीडित महिलेचा पती नैसर्गिक विधीसाठी गेला असता, आरोपीने काही क्षणात पीडितेला बसमधून पळवून नेली.

आरडा ओरड केल्यास जीवे मारेल, अशी धमकी आरोपीने पीडितेला दिली. स्वारगेटजवळ असलेल्या फुटपाथच्या बाजूला बस थांबून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पुन्हा कात्रज बस स्टॉप जवळील कॅनॉल फुटपाथच्या बाजूला बस थांबून पुन्हा तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. त्यानंतर बसमधून पीडित महिलेस खाली उतरवले आणि आरोपी तेथून पसार झाला. या प्रकरणी पीडित महिलेने पोलिसांकडे तक्रार दिल्यास पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा -

Last Updated : Jun 13, 2022, 5:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details