पुणे -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होण्याची ( Pune Metro Inauguration by PM ) शक्यता आहे. यात विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ ( Muralidhar Mohol on Pune Metro ) यांनी दिली.
पंतप्रधानाच्या दौऱ्यामध्ये मुख्यत्वे पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात ( PM Pune Visit in March ) येणार आहे. आहे. नदी सुधारणा प्रकल्पचे भूमी पूजन, पुणे महानगरपालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण, केंद्र सरकारच्यावतीने मिळणाऱ्या इलेक्ट्रॉनिक बसचा शुभारंभ , पंतप्रधान आवास योजनेच्या 1 हजार घरांची लॉटरीदेखील पंतप्रधानाच्या हस्ते काढली ( developing projects in Pune ) जाणार आहे.
हेही वाचा-Mumbai Film City Redevelopment : मुंबई चित्रनगरीच्या विकासाकरिता रामोजी फिल्म सिटीला निमंत्रण
आर.के. लक्ष्मण आर्ट गॅलरीचेदेखील ( R K Laxman Art Gallery in Pune ) यावेळी उद्घाटन होणार आहे, अशी शहरातील विविध महत्त्वाची कामे पंतप्रधानांच्या दौऱ्यामध्ये केली जाणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.