महाराष्ट्र

maharashtra

Santosh Jadhav Arrest : संतोष जाधव अटक प्रकरणी एडीजी कुलवंत सरंगल यांची पत्रकार परिषद, म्हणाले...

By

Published : Jun 13, 2022, 11:54 AM IST

Updated : Jun 13, 2022, 12:07 PM IST

संतोष जाधव आणि नवनाथ सुर्यवंशी ( Sharp Shooter Santosh Jadhav Arrested ) यांना काल रात्री गुजरातमधून अटक करण्यात आल्यानंतर एडीजी कुलवंत के सरंगल ( कायदा व सुव्यवस्था ) यांनी आज ( ADG Kulwant Sarangal Pc In Pune ) पत्रकार परिषद घेतली.

Moose Wala murder Case
Moose Wala murder Case

पुणे -संतोष जाधव आणि नवनाथ सुर्यवंशी ( Sharp Shooter Santosh Jadhav Arrested ) यांना काल रात्री गुजरातमधून अटक करण्यात आल्यानंतर एडीजी कुलवंत के सरंगल ( कायदा व सुव्यवस्था ) यांनी आज ( ADG Kulwant Sarangal Pc In Pune ) पत्रकार परिषद घेतली. दोघांना अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 20 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीशी त्यांचे संबंध आणि पंजाबी गायक सिद्दू मुसेवाला यांच्या हत्येसह पुढील तपास सुरू असल्याचेही ते म्हणाले.

प्रतिक्रिया

शार्प शूटर संतोष जाधव सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील आरोपी- सुप्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडात पुणे कनेक्शन असल्याचे पुढे आल्यानंतर राज्यात प्रचंड खळबळ उडाली होती. पुण्यातील सौरव महाकाल आणि संतोष जाधव या दोन कुख्यात आरोपीचा सिद्धूच्या हत्याकांडात सहभाग असल्याने पंजाब पोलीस त्यांच्या मागावर होते. दुसरीकडे पुण्यात घडलेल्या हत्याकांडाच्या घटनेतही पुणे ग्राणीण पोलीस सौरव महाकाल आणि संतोष जाधव या दोघांच्या मागावर होते. सिद्धू मुसेवाला हत्याकांडात या दोघांची नावे आल्याने हे पुण्यात सक्रिय असल्याचे उघड झाले. त्यानंतर पुणे पोलिसांनी आधी सौरव महाकालच्या मुसक्या आवळल्यानंतर रात्री संतोष जाधवलाही गुजरातमधून अटक केली.

हेही वाचा - सिद्धांत कपूर बंगळुरूमध्ये रेव्ह पार्टीतून पोलिसांच्या ताब्यात, ड्रग्ज टेस्टमध्ये आढळला पॉझिटिव्ह

Last Updated : Jun 13, 2022, 12:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details