महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सरकार संवेदनाहीन! पालकमंत्री म्हणायचं की मारकमंत्री? - प्रवीण दरेकर - गुलाब चक्रीवादळ

गुलाब चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मदत जाहीर न केल्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्य सरकार संवेदनाहीन झाले असून पालकमंत्र्यांना पालकमंत्री म्हणायचं की मारकमंत्री अशी टीका त्यांनी केली.

सरकार संवेदनाहीन! पालकमंत्री म्हणायचं की मारकमंत्री? - प्रवीण दरेकर
सरकार संवेदनाहीन! पालकमंत्री म्हणायचं की मारकमंत्री? - प्रवीण दरेकर

By

Published : Oct 2, 2021, 9:30 AM IST

Updated : Oct 2, 2021, 10:00 AM IST

पुणे : गुलाब चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मदत जाहीर न केल्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्य सरकार संवेदनाहीन झाले असून पालकमंत्र्यांना पालकमंत्री म्हणायचं की मारकमंत्री अशी टीका त्यांनी केली.

पालकमंत्री म्हणायचं की मारकमंत्री?
महाराष्ट्राच्या या सरकारमध्ये अशा पद्धतीचे बेजबाबदार पालकमंत्री मी पहिलेच नाही अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे. औरंगाबादचे पालकमंत्री फिरकलेच नाही. तर परभणीचे पालकमंत्रीही आले नाही. पालकमंत्री म्हणजे त्या जिल्ह्याचे पालकत्व त्यांच्याकडे असते. पण आज शेतकरी संकटात असताना त्या त्या जिल्ह्यातील पालकमंत्री फिरकलेच नाही. आता त्यांना पालकमंत्री म्हणायचं का मारकमंत्री म्हणायचं ही वेळ आल्याची टीका दरेकर यांनी केली. सरकारची संवेदना हरपली आहे. एवढे दिवस होऊनही सरकारने दमडीची मदत शेतकऱ्याला केलेली नाही. शेतकऱ्यांसाठी मागच्या वर्षी जाहीर केलेली मदत अद्याप भेटलेली नाही. हे सरकार केवळ घोषणाबाजी करत आहे. मात्र प्रत्येक्षात काहीही मदत होत नाही अशीही टीका त्यांनी केली.

म्हणून जलयुक्त शिवारला विरोध
राजकीय अविर्भावात जलयुक्त शिवार योजनेवर टीका होत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी एवढा आकस आणि तिरस्कार या मंडळींना आहे की त्यांची यशस्वी योजना कशी फेल करायची यावर यांचा विचार असतो. त्याच भावनेतून जलयुक्त शिवार योजनेवर टिका केली जात आहे असंही दरेकर म्हणाले.

राऊत आणि मलिकांना आम्ही सिरीयस घेत नाही
प्रसारमाध्यमांतून जनतेच्या प्रश्नाबाबत भूमिका जात असतील तर आम्ही त्याचं स्वागत करू. विकासाच्या बाबतीत वक्तव्य असतील तरीही आम्ही स्वागत करू. आज शेतकरी संकटात आहे. त्याला धीर देणारी वक्तव्यं असतील तर आम्ही त्याचं स्वागत करू. पण प्रत्येक वेळेला संजय राऊत आणि नवाब मलिक हे राजकीय अभिनिवेशातून, तिरस्काराने वक्तव्य करत असतील तर कश्यासाठी आपण आपला वेळ वाया घालवायचा असे दरेकर म्हणाले. आज लोकही त्यांना सिरियसली घेत नाही. फक्त केंद्र सरकार, राज्यपाल, भाजप, फडणवीस एवढंच चाललं आहे. यापलीकडे काही प्रश्न आहे की नाही. त्यामुळे त्यातील सिरीयसनेस निघून गेला आहे असंही दरेकर म्हणाले.

राजकारणात काहीही होऊ शकतं
सध्या भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या युतीबाबत जोरदार चर्चा सुरू असून यावर देखील प्रवीण दरेकर यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. युतीचा फायदा हा होतंच असतो पण युती बाबतचा निर्णय आमच्या पक्षातील नेते घेणार आहे. राजकारणात काहीही होऊ शकत असं देखील यावेळी दरेकर यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा -Marathwada Flood : मराठवाडयात ओला दुष्काळ जाहीर करा, दरेकरांची मागणी

Last Updated : Oct 2, 2021, 10:00 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details