महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

​आर्टिकल 370 अमेरिकेच्या सांगण्यावरून काढण्यात आले का? मोदी, शहांनी उत्तर द्यावे - प्रकाश आंबेडकर - prakash ambedkar

काही दिवसांपूर्वी काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्यास तयार असून नरेंद्र मोदींनी मला तशी विनंती केली आहे. असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगीतले होते. त्यामुळे आर्टिकल 370 हटवण्यासंबंधी जी मोहीम सुरू आहे. ती अमेरिकेच्या सांगण्यावरून झाली आहे का? असा खुलासा करण्याची मागणी प्रकाश आंबेडकर केली आहे.

प्रकाश आंबेडकर

By

Published : Aug 6, 2019, 9:53 AM IST

पुणे - काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्यास तयार असून नरेंद्र मोदींनी मला तशी विनंती केली आहे. असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले होते. त्यामुळे आर्टिकल 370 हटवण्यासंबंधी जी मोहीम सुरू आहे. ती अमेरिकेच्या सांगण्यावरून झाली आहे का? याचा खुलासा भाजप सरकारने करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
आंबेडकर पुढे बोलतांना म्हणाले, पाकव्याप्त काश्मीर ज्यावर आपण दावा करतो, तो आता नव्याने येणाऱ्या भारताच्या नकाशात दाखवला जाणार का? आणि सद्यस्थितीत जी लाईन ऑफ कॅट्रोल आहे तीच आंतरराष्ट्रीय लाईन ऑफ कॅट्रोल होणार आहे का? याचा खुलासा सरकारने करावा. असे न केल्यास 370 हटवण्याची मोहीम, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डोक्यातून निघाली असेच माझे मत असेल. तसेच अमेरिकेच्या सांगण्यावरूनच ही मोहीम घडली असे मी समजेल.

ABOUT THE AUTHOR

...view details