महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या क्रिकेटप्रेमींवर पुण्यात पोलिसांचा लाठीमार - Punekar cricket Fans

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या सामन्यात भारताने विजय मिळविल्यानंतर अनेक क्रिकेटप्रेमी विजयानंतर रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले.  सर्वत्र तिरंगा, भगव्या पताका आणि फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली.

पुणे पोलीस

By

Published : Jun 17, 2019, 2:31 AM IST

Updated : Jun 17, 2019, 6:05 PM IST

पुणे - विश्वचषक सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केल्यानंतर पुण्यात जल्लोष आनंद आणि उत्साहाचे वातावरण झाले. मात्र पोलिसांनी लाठीचार्ज करून डेक्कन चौक व फर्ग्यूसन मार्गावारील चार ते पाच क्रिकेटप्रेमींना चोप दिला आहे.

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या सामन्यात भारताने विजय मिळविल्यानंतर अनेक क्रिकेटप्रेमी विजयानंतर रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. सर्वत्र तिरंगा, भगव्या पताका आणि फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली.

दिवाळी साजरी करावी तसे पुणेकर काही ठिकाणी आनंद साजरा करताना दिसत होते. संपूर्ण फर्ग्यूसन रस्ता, डेक्कन मार्ग परिसरात पुणेकरांचा उत्साह ओसंडून वाहत होता. पुण्यातील डेक्कन चौकातील उत्साही क्रिकेटप्रेमींना आवरण्यासाठी पोलीस डेक्कन चौकात दाखल झाले. गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांनी काही क्रिक्रेटप्रेमींवर लाठीचार्ज केला. त्याचबरोबर फर्ग्यूसन मार्गावरही अनेक उत्साही क्रीडाप्रेमींना पोलिसांनी चोप दिला. त्यानंतर गर्दी काही प्रमाणात पांगली. मध्यरात्री एक वाजून गेल्यानंतरही क्रिकेटप्रेमींची गर्दी नियंत्रणाचा पोलीस प्रयत्न करत होते.

Last Updated : Jun 17, 2019, 6:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details