पुणे - जनतेच्या सुरक्षेसाठी सदैव तैनात असलेल्या पोलीस बांधवांना अनेक छंद जोपासताना आपण पाहिलं आहे. असेच खाकीत सेवा देऊन आपले छंद जोपासणारा पुणे पोलिसांतील क्राईम युनिट-४ चा कॉन्स्टेबल सागर घोरपडे यालाही गायनाची आवड आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नवीन गाणं गायलं आहे. त्यांनी गायलेली अनेक गाणी सोशल मिडियावर व्हायरल झाली आहेत. त्यातच त्यांनी आता गणपतीसाठी खास नवीन गाणं बनवल आहे.
‘गण गण गणराया रे, तेरा ही साया है...खाकीतील कलाकारानं रचलं बाप्पावर गाणं
जनतेच्या सुरक्षेसाठी सदैव तैनात असलेल्या पोलीस बांधवांना अनेक छंद जोपासताना आपण पाहिलं आहे. असेच खाकीत सेवा देऊन आपले छंद जोपासणारा पुणे पोलिसांतील क्राईम युनिट-४ चा कॉन्स्टेबल सागर घोरपडे यालाही गायनाची आवड आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नवीन गाणं गायलं आहे. त्यांनी गायलेली अनेक गाणी सोशल मिडियावर व्हायरल झाली आहेत. त्यातच त्यांनी आता गणपतीसाठी खास नवीन गाणं बनवल आहे.
कॉन्स्टेबल सागर घोरपडे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘गण गण गणराया रे, तेरा ही साया है….’ हे गाण घेऊन आले आहेत. विशेष म्हणजे सध्याचं करोनाचं संकट त्यांच्यावरही ओढवलं होतं. घोरपडे याला करोनाची लागण झाली होती. मात्र त्यावर यशस्वीरित्या मात करून ते पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले आहेत.
घरात लहानपणापासूनच अध्यात्माचं वातावरण होतं, आणि त्यातून गायनाची आवड निर्माण झाल्याचे घोरपडे यांनी सांगितले. नंतर त्यांनी गायनाचे रितसर शिक्षण घेतले. पोलीस विभागात रुजू झाल्यानंतर सात वर्षांचा काळ लोटला. पोलीस दलात असतानाही माझी गायनाची आवड जोपासली.
आजवर अनेक गाणी सादर केली. आता मी सर्वांसमोर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘गण गण गणराया रे, तेरा ही साया रे’ हे गाण घेऊन आलो आहे, असे त्यांनी म्हटले. या गाण्यासाठी कमी वेळेत जास्त मेहेनत घ्यावी लागली. हे गाण काही तासांत तयार झालं असून त्याला सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यापुढील काळातही आपल्या सर्वासाठी गाणं घेऊन येत राहील, अशी इच्छा पोलीस कॉन्स्टेबल सागर घोरपडे याने व्यक्त केलीय.