महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुणेकरांसाठी गुड न्यूज ! पीएमपीएमएलची 5 रुपयांत 5 किमी प्रवासाची नवी योजना - पीएमपीएमएल

पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. पीएमपीएमएलने प्रवाशांसाठी एक खास योजना आणली आहे. 5 रुपयांत 5 किलोमीटरपर्यंतचा प्रवास अशी ही योजना आहे. महत्वाचे म्हणजे दर 5 मिनिटाला ही बस उपलब्ध होणार आहे. मध्यवर्ती पुणे तसेच उपनगरांतील एकूण 37 मार्गांवर अशा सुमारे 350 मिनी बसेस धावणार आहेत.

pune news
पीएमपीएमएलची 5 रुपयांत 5 किमी प्रवासाची सुविधा

By

Published : Oct 21, 2020, 3:26 PM IST

पुणे - पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेल्या पीएमपीएमएलने प्रवाशांसाठी एक खास योजना आणली आहे. 5 रुपयांत 5 किलोमीटरपर्यंतचा प्रवास अशी ही योजना आहे. महत्वाचे म्हणजे दर 5 मिनिटाला ही बस उपलब्ध होणार आहे. या योजनेला अटल म्हणजेच 'अलाइनिंग ट्रान्झिट ऑन ऑल लेन्स' असं नाव देण्यात आले आहे.

पीएमपीएमएलची 5 रुपयांत 5 किमी प्रवासाची सुविधा

मध्यवर्ती पुणे तसेच उपनगरांतील एकूण 37 मार्गांवर अशा सुमारे 350 मिनी बसेस धावणार आहेत. प्रवाशांची संख्या वाढवण्याबरोबरच त्यांना जलद सेवा उपलब्ध करून देण्याचा उद्देश या योजेनेमागे आहे. यातून पीएमपीएमएलच्या उत्पन्नात देखील वाढ होणार आहे. येत्या शनिवारी या योजनेचे उद्घाटन भाजचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

शहरातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत बस पोहोचावी या उद्देशाने हे नवे मार्ग सुरू करण्यात आले आहे. बस डेपोपासून आतल्या भागात राहणारे नागरिक व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना बस डेपोपर्यंत पोहोचण्यासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन हे 37 मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details