पुणे - कोरोनाच्या संकटामुळे मागील 5 महिन्यांपासून बंद असलेली पीएमपीएमएल सेवा आजपासून सुरू झाली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील 190 मार्गांवर आता 421 बसेस धावणार आहेत. तिकीटात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. योग्य ती खबरदारी घेऊन पीएमपीएमएल सुरू करण्यात आली आहे.
स्वारगेट, पुणे मनपा, शिवाजीनगर, हडपसर, पुणे स्टेशन, हडपसरसारख्या गर्दीच्या मार्गांवर सकाळी आणि सायंकाळी शटल सेवा दिली जाणार आहे. त्यासाठी 120 जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अत्यावश्यक सेवेसाठी दोनशे बस आधीपासूनच मार्गावर धावत होत्या. उर्वरित दोनशे, अडीचशे बसचा ताफा सेवेसाठी तयार करण्यात आला आहे. बसमध्ये एकावेळी 17 किंवा 20 प्रवाशांना प्रवासाची परवानगी असेल. महिला व पुरुष प्रवाशांचे यात नियोजन करण्यात आले आहे.