देहू ( पुणे ) -जगद्गुरू तुकाराम महाराज यांची मूर्ती आणि शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 14 जूनला होणार आहे. काही दिवसांपूर्वीच देहू संस्थानाच्या विश्वस्तांना घेऊन भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi Dehu Visit ) यांची दिल्लीत भेट घेतली होती. त्यावेळी त्यांना देहूत येण्याचे आमंत्रण दिले होते. हे आमंत्रण पंतप्रधानांनी स्वीकारले असून 14 जूनला पंतप्रधान देहूत येणार आहेत. भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता. चौदा वर्षांनंतर या मंदिराचे लोकार्पण होत आहे. सर्व सामान्यांच्या लोक सहभागातून हे मंदिर उभे राहिले, असल्याचे मंदिराचे विश्वस्थ माणिक महाराज मोरे ( Manik Maharaj More ) यांनी सांगितले आहे.
दोन वर्षानंतर होणार पायी पालखी सोहळा :पंतप्रधान मोदी 14 जूनला देहूत येणार आहेत आणि यंदाचा तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा 20 जूनपासून सुरू होईल. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संक्रमणामुळे होऊ न शकलेला वारीचा सोहळा यावर्षी मोठ्या उत्साहात होणार आहे. देहू संस्थांच्या वतीने मोठ्या संख्येने वारकरी, टाळकरी या मंदिराच्या लोकार्पणसाठी राज्य भरातून येणार आहेत.
प्रतिक्रिया देताना मंदिर विश्वस्त
मंदिराची वैशिष्ट्ये :हे मंदिर पूर्ण दगडात बांधले आहे. याची उंची साधारणपणे 42 फुटांपर्यंत आहे. हेमाडपंथी हे मंदिर आहे. आपल्या वातावरणाला सुट होतील, असे दगड वापरण्यात आले आहेत. तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडविल्यानंतर अभंग गाथा इंद्रायणीच्या पाण्यातुन तरल्या आणि वर आल्या. तोपर्यंत तुकाराम महाराजांनी 13 दिवस अन्नपाणी ग्रहण केले नाही आणि 13 दिवस उपोषणाला महाराज ज्या शिळेवर ( दगडावर) बसले होते. ती शिळा भाविकांना दर्शनासाठी देहूतील मुख्य मंदिरात स्थापित केली आहे, म्हणून मंदिरास शिळा मंदिर असे संबोधले जाते.
मंदिराचा इतिहास :जगद्गुरू तुकाराम महाराजांचे तृतीय चिरंजीव नारायण महाराज आणि सर्व वारकऱ्यांनी जेव्हा तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन झाले. त्यानंतर आनंदडोह येथून शिळा म्हणजेच हा दगड आनला. त्या शिळेची नंतर येथे आणून पूजा केली. ही शिळा याठिकाणी स्थापन झाल्यापासून सर्व वारकरी संप्रदाय आणि संस्थान याठिकाणी पूजा करून महाराजांना यात पाहात होते. शिवाजी गुत्ते नावाच्या कारागिराने या मंदिराची निर्मिती केली आहे.
मंदिर रचना - हेमाडपंथी,मूळ गर्भगृह 14×14 अंतर, गर्भ गृह 9×9 उंची 17x12, मंदिराची उंची 42 फूट, मूर्तीची उंची 42 इंच इतकी आहेय
हेही वाचा -Dedication Of Tukaram Maharaj Shila Mandir : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार जगद्गुरु तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण