पुणे -सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका विवाहित तरुणाला गे ॲपवरील अनोळखी व्यक्तींची मैत्री चांगलीच महागात पडली. गे ॲपवर चॅटिंग केल्यानंतर समलैंगिक संबंध ठेवण्यासाठी गेलेल्या तरुणाला चार जणांनी जबर मारहाण केली. इतकेच नाही तर कोयत्याचा धाक दाखवून त्याच्या जवळील ८१ हजार रुपयांचा ऐवज काढून घेण्यात आला. एका ३४ वर्षीय तरुणाने याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यामध्ये आज तक्रार दिली असून चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण विवाहित असून एका खासगी कंपनीत कामाला आहे. ९ ऑगस्टला सकाळी १० वाजण्याच्या सुमारास तो एका गे चॅट ॲपवर ऑनलाईन असताना रवी नावाच्या व्यक्तीने त्याला मेसेज केला. त्यानंतर दोघांत चॅटिंग झाले आणि समलैंगिक संबंध ठेवण्यासाठी चॅटिंग करणाऱ्या व्यक्तीने सांगितल्यानुसार तरुण सिंहगड रोडवरील एका फ्लॅटवर गेला. तिथे गेल्यानंतर तक्रारदार आणि आरोपी यांची भेट झाली. यानंतर थोड्या वेळाने तिथे आलेल्या तिघांनी तक्रारदार तरुणाला लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली.
गे अॅपवर चॅटिंग करणे विवाहित तरुणाला पडले महागात; 4 जणांकडून मारहाण पैसेही गेले - गे अॅपवरील चॅटिंग पडले महागात
पुण्यातील एका विवाहित तरुणाला गे अॅपवर चॅटिंग करणे महागात पडले आहे. चॅटिंगनंतर समलैंगिक संबंध ठेवण्यासाठी गेल्यानतंर त्याला मारहाण करण्यात आली आणि त्याकडील रोख रक्कम आणि सोने चांदीच्या अंगठ्या असा एकूण ८१ हजार रुपयांचा ऐवज लुटण्यात आला. संबधित तरुणाने आज सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
हेही वाचा-पिस्तुलाचा धाक दाखवून सॉफ्टवेअर इंजिनिअरला लुटले; परिसरात दहशतीचे वातावरण
आरोपी तक्रारदाराला कोयत्याचा धाक दाखवून त्याच्या जवळील रोख रक्कम, सोन्या चांदीच्या अंगठ्या, चांदीचे ब्रेसलेट, एटीएम व गुगल पे मधील रोख रक्कम असा एकूण ८१ हजारांचा ऐवज काढून घेतला. तसेच या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ काढला. याविषयी कुणाला सांगितल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही दिली होती. त्यामुळे बदनामीच्या भीतीने तक्रारदार काही दिवस गप्प होते. परंतु, त्याने हा सर्व प्रकार मित्राला सांगितला. मित्राने सल्ला दिल्यानंतर त्यांनी सिंहगड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली.