पुणे - गेल्या काही दिवसांपासून भारत-चीन सीमेवर तणावाचे वातावरण आहे. दोन्ही देशादरम्यान झालेल्या झटापटीत भारताच्या २० जवानांना वीरमरण आले. या संपूर्ण प्रकारामुळे देशात संतापाचे वातावरण असून चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरत आहे. याच संकल्पनेवर पुण्यात भव्य रांगोळी साकारण्यात आली.
पुणेकरांनी भव्य रंगावलीतून दिला स्वदेशीचा नारा; चिनी मालावर बहिष्कार
टिळक रस्त्यावरील स.प. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर चिनी वस्तूंवर बहिष्कार टाका, असा संदेश देणारी रांगोळी साकारण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून भारत-चीन सीमेवर तणावाचे वातावरण आहे, त्यामुळे चिनी मालावर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरत आहे.
टिळक रस्त्यावरील स.प. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर ही रांगोळी साकारण्यात आली. ढोल ताशा महासंघ महाराष्ट्र, शिक्षण प्रसारक मंडळी आणि राष्ट्रीय कला अकादमी यांच्यावतीने हे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महेश करपे, दिलीप शेठ, ढोल ताशा महासंघाचे पराग ठाकूर, अमोल साठ्ये, संजय सातपुते, सूर्यकांत पाठक, मंदार रांजेकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पराग ठाकूर म्हणाले, चीनला धडा शिकवण्यासाठी भारतीयांची एकजूट आवश्यक आहे. चीनच्या सर्व वस्तूंचा बहिष्कार आपण करायला हवा. स्वदेशी वस्तू जास्तीत जास्त वापरायला हव्यात, हाच चीन विरोधातील भारतीयांचा लढा असेल. चीनची आर्थिक बाजू मोडकळीस आणणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.