पुणे / नाशिक - कोरोनाच्या संसर्गामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. त्यातच आता पुणे आणि नाशिकमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. वादळी वाऱ्यासह नाशिक परिसरात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता पसरली आहे. अवकाळी पावसामुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
पुण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. शहरातील मार्केटयार्ड, कोंढवा, स्वारगेट, कात्रज, विश्रांतवाडी, शिवाजीनगर यासह बहुतांश भागात पाऊस कोसळत आहे. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट यासह अवकाळी पाऊस कोसळत आहे.
हवामान खात्याने बुधवार वातावरण बदलामुळे राज्यात अनेक ठिकाणी पुढील पाच दिवस पावसाची शक्यता असल्याचे सांगितले होते. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ मुंबईसह पुण्यातही पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यामुळे आता हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरताना दिसत आहे.
पुणे शहरासह जिल्ह्यातही मंगळवार रात्रीपासून ढगाळ वातावरण आहे. बुधवारीही शहरातील अनेक भागात पाऊस पडला होता. येत्या तीस तारखेपर्यंत ढगाळ वातावरण राहील. तर काही ठिकाणी शहरात आणि जिल्ह्यात तुरळक पाऊस पडेल. तुरळक ठिकाणी गारपिटीचाही इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर वादळवाराही निर्माण होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
चिंता वाढली; पुणे, नाशिक परिसरात विजेच्या कडकडाटांसह अवकाळी पावसाला सुरुवात - पंचवटी
पुणे आणि मुंबईत कोरोनाचा संसर्ग पसरल्याने नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत. त्यातच आता पुणे परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यासह नाशिक परिसरातही अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे.
पुणे, नाशिक परिसरात विजेच्या कडकडाटांसह अवकाळी पावसाला सुरुवात
नाशिकमधील काही भागात विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस बरसल्याने नागरिक चिंताग्रस्त झाले आहे. दुसरीकडे नाशिक शहरातील गंगापूर रोड, शालिमार , द्वारका, पंचवटी, सिडको भागात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान अवकाळी पावसामुळे नागरिकांना प्रकृतीची अधिक काळजी घ्यावी लागेल अशी माहिती वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.