पुणे -जो जो हिंदू हिताच्या गोष्टी करेल त्या सरकारला आमचा पाठिंबा असेल असे कालीचरण महाराज यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चांगले काम करत आहेत. त्यासाठी आम्हाला काही हरकत नाही. जे हिंदूंची हित करतील त्यांना नेहमीच पाठवा असेल हिंदुत्ववादी लोक आहेत त्यांनी शासनामध्ये बसायला पाहिजे असा अंदाज आहे तो हिंदूंचे रक्षण करेल. त्याला आम्ही मतदान करणार असेही कालीचरण महाराज ( Kalicharan Maharaj ) यांनी म्हटले आहे. ते पुण्यात बोलत होते.
शिंदे सरकारकडून चांगले काम -उद्धव ठाकरेंना आम्ही काय सल्ला देणार आत्ता सल्ला देऊन काय उपयोग त्याचे सरकार गेले ( Uddhav Thackeray government is gone )आहे. शिंदे सरकार चांगले काम करत आहे. असे कालीचरण महराज यांनी म्हटले आहे. शिवसेनेतून बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत सत्तास्थापन केली. त्यासाठी एकनाथ शिंदे यांनी शिवेसनेतील अनेक बड्या नेत्यांनी पाठिंबा जाहिर केला होता. त्यानंतर शिवसेनेला उतरती कळा सुरू झाली आहे.
दीपोत्सवकरून म्हसोबारायाला नमन -शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्या महात्मा फुले मंडई, बुरुड आळी येथे आयोजित म्हसोबा उत्सवात दीप अमावस्येला ( Deep Amavasya ) दीपोत्सव करण्यात आला होता. पारंपरिक समया आणि फिरत्या पणत्या अशा ५११ दिव्यांनी मंडईतील म्हसोबा मंदिराचा परिसर उजळून निघाला ( 511 lamps illuminated in Mhasoba temple ). दीप अमावस्येनिमित्त दीप पूजन व दीपोत्सव करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने म्हसोबारायाला नमन करण्यात आले. फिरत्या दिव्यांच्या प्रकाशात मंदिराला केलेली फुलांची सजावट अधिक आकर्षक दिसत होती.