महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी 151 किलोचा मोदक अर्पण

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी मावळ भागातील एका गणेश भक्ताने 151 किलो माव्याचा मोदक अर्पण केला.

151 किलोचा मोदक

By

Published : Sep 3, 2019, 12:11 PM IST

Updated : Sep 3, 2019, 2:57 PM IST

पुणे - शहरातील मानाच्या पाच गणपतीप्रमाणेच श्रीमंत दगडूशेठ गणपतीला भक्तांची गर्दी असते. दगडूशेठ गणपतीचे यंदाचे हे 127 वे वर्ष आहे. या गणपतीची आकर्षक सजावट आणि सुंदर मूर्ती पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करतात. गणपतीच्या आवडीचा प्रसाद म्हणजे मोदक, ​श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी मावळ भागातील एका गणेश भक्ताने 151 किलो माव्याचा मोदक अर्पण केला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

यंदा दगडूशेठ गणपती मंदिराची सजावट असलेले श्री गणेश सूर्यमंदिर, ओडिशा राज्यातील जगप्रसिद्ध प्राचीन आश्चर्य ठरलेल्या कोणार्कच्या सूर्यमंदिरावर आधारित आहे. लाखो मोतिया रंगाच्या दिव्यांनी हे मंदिर उजळून निघाले आहे. शिवाय अत्याधुनिक लाईटने विद्युतरोषणाई देखील करण्यात आली आहे. मंदिरामध्ये तसेच रस्त्याच्या दुतर्फा २२५ झुंबर लावण्यात आली आहेत.

Last Updated : Sep 3, 2019, 2:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details