महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

VIDEO : पुण्यात भरधाव दुचाकीची पीएमपीला धडक, तरुणाचा मृत्यू - pune accident news

हा अपघात रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास झाला. आकाश तुकाराम विधाते असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

pune accident
पुण्यात भरधाव दुचाकीची पीएमपीला धडक

By

Published : Feb 3, 2020, 1:08 AM IST

पुणे- टिळक रस्त्यावर झालेल्या विचित्र अपघातात एका 24 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. रिक्षाला धडक झाल्यानंतर भरधाव दुचाकी समोरून येणाऱ्या पीएमपी बसला धडकली. यात दुचाकीस्वार पीएमपीच्या खाली जाऊन अडकला. गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

पुण्यात भरधाव दुचाकीची पीएमपीला धडक

दरम्यान, हा अपघात रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास झाला. आकाश तुकाराम विधाते असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

हेही वाचा -पोपट पिंजऱ्यात कैद करणे पडले महागात, न्यायालयाने सुनावला 25 हजाराचा दंड

आकाश हा पुण्यातील बाणेर येथील रहिवासी आहे. त्याच्या कुटुंबियांचा दुग्ध व्यवसाय आहे. टिळक रस्त्यावरील दुर्वांकूर हॉटेलजवळ हा अपघात झाला. भर दुपारी झालेल्या या अपघातामुळे टिळक रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आकाशला ससून रुग्णालयात दाखल केले. तपासणीअंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

ABOUT THE AUTHOR

...view details