पुणे - बुधवार पेठ परिसरात चार जणांनी केलेल्या हल्ल्यात शिवसेनेच्या माजी दिवंगत नगरसेवकाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. दीपक मारटकर मृत तरुणाचे नाव असून मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. शहराच्या मध्यवस्तीत हा प्रकार घडल्याने संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे.
रात्रीचे जेवण करून दीपक बाहेर आल्यानंतर आधीच दबा धरून बसलेल्या तीन ते चार अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर चाकू आणि कोयत्याने हल्ला चढवला. डोके, पाठ आणि छातीवर सपासप वार करून हल्लेखोर दुचाकीवरून पळून गेले. गंभीर जखमी झालेल्या दीपक यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
पुण्यात मध्यरात्री खुनाचा थरार...कोयत्याने वार करून शिवसेना नेत्याच्या मुलाची हत्या - पुणे क्राइम
रात्रीचे जेवण करून दीपक बाहेर आल्यानंतर आधीच दबा धरून बसलेल्या तीन ते चार अज्ञात हल्लेखोरांनी चाकू आणि कोयत्याने हल्ला चढवला. यामध्ये दीपक मारटकर याचा मृत्यू झाला आहे.
पुण्यात मध्यरात्री खुनाचा थरार...कोयत्याने वार करून राजकीय वर्तुळातील एकाची हत्या
संबंधित घटनेची माहिती मिळताच फरासखाना पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आरोपीचा शोध घेण्यासाठी त्यांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. या सीसीटीव्हीच्या माध्यमातून तीन दुचाकीवरून सहा तरुण आलेले दिसत आहे. या सर्व तरुणांनी तोंडाला मास्क लावल्याने सध्या त्याची ओळख पटली नाही.