पुणे - कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन प्रकाराने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. याचा प्रसार वेगाने होऊ शकतो अशी चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अशातच पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे ओमायक्रॉनचे सात रुग्ण आढळून ( omicron patients found in junnar ) आल्याने पुणेकरांच्या चिंतेत भर ( Omicron in Pune ) पडली आहे.
रुग्णांना कोणतीही लक्षणे जाणवत नाहीयेत -
या रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते. जीनोम सिक्वेंसिंग चाचणीत त्यांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे समोर आले आहे. प्राथमिक माहितीनुसार या रुग्णांना कोणतीही लक्षणे जाणवत नाहीयेत. वारूळवाडी उपकेंद्राच्या माध्यमातून १६ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी ७ जणांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे समोर आले आहे. या सातही रुग्णांना नारायणगाव ग्रामीण रुग्णालय येथे क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती आहे.