पुणे मी मुख्यमंत्री असताना सुरेश कलमाडी ( Former Congress Leader Suresh Kalmadi ) यांनी मला या पुणे फेस्टिव्हलमध्ये निमंत्रित केले होते. मी तेव्हा निघालो होतो आणि येथे पोहचता पोहचता उपमुख्यमंत्री झालो. मी पहिल्यांदा बोलून इथून जाण्याची परवानगी मागितली. कारण कार्यक्रम संपेपर्यंत उपमुख्यमंत्र्याचा मंत्री झालो आणि मंत्र्याचे आमदार झालो तर कोण रिस्क घेणार, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy CM Devendra Fadnavis ) यांनी व्यक्त केले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन ३४व्या पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अध्यक्षतेखाली गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट, पुणे येथे संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. या उद्घाटन सोहळ्यात खासदार उदयनराजे ( MP Udayanaraje ), खासदार गिरीश बापट ( MP Girish Bapat ), अभिनेते सुनील शेट्टी ( Actor Sunil Shetty ) आदी मान्यवर उपस्थित होते.
पुणे फेस्टिव्हलमध्ये भारतरत्नांना आदरांजली पुण्याचे नाव जागतिक उद्योग नकाशावर नेणारे व पुणे फेस्टिव्हलशी प्रथम वर्षापासून जोडले गेलेले ज्येष्ठ उद्योगपती पद्मभूषण कै. राहुल बजाज यांच्या पवित्र स्मृतीस यंदाचा ३४वा पुणे फेस्टिव्हल अर्पण करण्यात आला आहे. यंदा पुणे फेस्टिव्हलमध्ये भारतरत्न लता मंगेशकर, भारतरत्न पं. भीमसेन जोशी, पद्मविभूषण पं. शिवकुमार शर्मा, पद्मविभूषण अभिनेते दिलीप कुमार आणि शिवशाही बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहणारे कार्यक्रम झाले. यावेळी पुणे फेस्टिव्हलच्या पॅट्रन अभिनेत्री नृत्यांगना खा. हेमा मालिनी यांनी यंदा उद्घाटन सोहळ्यात गणेश वंदना सादर केली.
पुणे फेस्टिव्हल अवॉर्डने गौरवयावेळी ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अॅड. एस. के. जैन, ज्येष्ठ दिग्दर्शिका पद्मभूषण सई परांजपे, एन. ए. ए. सी. (नॅक) चे चेअरमन डॉ. भूषण पटवर्धन, प्रख्यात शास्त्रीय गायक राहुल देशपांडे आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना 'पुणे फेस्टिव्हल अवॉर्ड’ने उद्घाटन सोहळ्यात गौरविण्यात आले. ज्येष्ठ शिक्षण तज्ञ व सिंबायोसिसचे संस्थापक पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांना या सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक गणेशोत्सवाची शताब्दी साजरी करणाऱ्या पुण्यातील चैतन्य मंडळ (डेक्कन जिमखाना) आणि राजर्षी शाहू मंडळ (शुक्रवार पेठ) या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा सत्कार करण्यात आला.
भव्य उद्घाटन सोहळापुणे फेस्टिव्हलचा उद्घाटन सोहळादेखील दरवर्षीप्रमाणे नेत्रदीपक असेल. ढोल-ताशांचा गजरात दीपप्रज्वलन व तुकाराम दैठणकर यांच्या सनई वादनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अभिनेत्री नृत्यांगना हेमा मालिनी गणेश वंदना सादर करून ३४व्या पुणे फेस्टिव्हलच्या उद्घाटन सोहळ्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात केली. ज्येष्ठ गायक शंकर महादेवन यांच्या नव्या गीतावर आधारित २५ सहकलावंतांसह त्यानी गणेश वंदना सादर केले.
लता दीदींचे प्रसिद्ध गाणी केली सादर भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना त्यांची भाची व गायिका राधा मंगेशकर ‘मोगरा फुलला’ आणि ‘जय देव जय देव जय शिवराय’ ही गाणी सादर करून आदरांजली वाहिली. भारतरत्न स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांना त्यांचे शिष्य पं. उपेंद्र भट ‘तीर्थ विठ्ठल’ आणि ‘माझे माहेर पंढरी’ या अभंगांद्वारे श्रद्धांजली अर्पण केलं.‘स्वरस्वप्न’ ग्रुप तर्फे ७ ते २२ वर्षे वयोगटातील ४० मुले व मुली भारतरत्न (कै.) लता मंगेशकर आणि पद्मविभूषण (कै.) पं. शिवकुमार शर्मा यांना सामूहिक व्हायोलिनद्वारा श्रद्धांजली अर्पण केली. याचे संगीत संयोजन स्वप्ना दातार यांनी केले आहे. १९५७चे ‘आझाद’ चित्रपटातील ‘राधा ना बोले ना बोले ना बोले रे...’ हे लता दीदींचे प्रसिद्ध गाणे आणि ‘शिवहरी’ या जोडीने अजरामर केलेली राग हंसध्वनीमधील ‘जा तोसे नही बोलू कन्हैया’ हे द्रुत त्रितालमधील शास्त्रीय बंदिश ‘झाला’ पद्धतीत व्हायोलिनवर सादर केले.
महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेचे विलोभनीय दर्शन यंदा महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेचे विलोभनीय दर्शन घडवणारा ‘खेळ मांडीयेला..’ हा दिंडीचा विशेष कार्यक्रम ६० वारकऱ्यांनी सादर केला. हे वारकरी प्रेक्षकांतून दिंडी घेऊन मंचावर रिंगण केले. त्यानंतर फुगड्या, पाऊल्या, वाटचालीचा अभंग, ज्ञानोबा-तुकारामांचा गजर करीत पखवाज, वीणा, टाळ तसेच पताका-झेंडे याद्वारे वारीचे दर्शन घडवला. डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे आणि ज्ञानेश्वर माउलींचे पुजारी अवधूत गांधी यांनी याचे दिग्दर्शन व सादरीकरण केले आहे. यानंतर ‘कल्चर्स ऑफ इंडिया’ हा महाराष्ट्र, राजस्थान आणि पंजाब या राज्यातील संस्कृतीचे दर्शन घडवणारा कार्यक्रम सादर झाला. ‘पिंगा’ (मराठी), ‘घुमर’ (राजस्थानी) आणि ‘भांगडा’ (पंजाबी) याद्वारे सादर होणाऱ्या कार्यक्रमात मीरा जोशी, मधुरा देशपांडे आणि नुपूर दैठणकर या तीन अभिनेत्री नृत्याविष्कार सादर केले. याची संकल्पना, निर्मिति व दिग्दर्शन स्वप्नील रास्ते यांनी केले आहे.